
Table of Contents
मलेरिया काय आहे (Maleria Kai aahe) ?
(Maleria Kai aahe) मलेरिया म्हणजेच हिवताप. हा आजार एका परजीवी म्हणजेच parasite मुळे होतो. खरे सांगायचे तर हा आजार प्लास्मोडियम जातीच्या protozoa परजीवी मुळे होतो. हा एक गंभीर आजार आहे. ज्यामध्ये सक्रमित डास हे मनुष्याला चावतात आणि ते संक्रमण मनुष्याला होतो. ह्या आजरा मध्ये खूप ताप येतो. ताप आल्या नंतर खूप थंडी वाजते आणि शरीर पण कापायला लागते. वेळेच उपचार नाही केले तर जीव जायची पण भीती असते.
मलेरिया किंवा हिवताप आजाराची लक्षणे
(Maleria Kai aahe) मलेरिया ची परजीवी वाहक मादा Anopheles आहे. ह्याच्या चावण्यामुळे ते संक्रमण आपल्या रक्तामधील लाल कोशिका मध्ये जाते आणि लाल कोशिकांना डबल करायचे काम करते. आणि त्यामुळे तुम्ही खालील काही लक्षणे स्वतःमध्ये बघू शकता.
जेव्हा पण तुम्हाला खूप ताप येत असेल आणि खूप औषधे करून सुद्धा थांबत नाहीय, खूप थंडी वाजणे हे सर्वात प्रथम लक्षणे आहेत.
तसेच तुमच्या पोटाच्या खालील बाजूला खूप दुखणे चालू होईल. काही वेळाने तुम्हाला त्या दुखण्यामुळे उलट्या चालू होतील. पोटाचे त्रास वादात जातील जसे की diarrhoea. काही पेशंट चे तर हृदयाचे ठोके पण जलद गतीने वाढल्या जातात.
काही दिवसांनी म्हणजेच सध्या क्लिनिक मधून उपचार चालू असेल तर ६ — ८ दिवसात तुम्हाला बरे वाटेल पण काही दिवसांनी त्याची परत पुनरावृत्ती होऊन ताप यायला चालू होईल.
जेव्हा पण असे आढळून येईल तेव्हा लगेच जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करा. तिथे तुमचे Blood Test केले जाईल. आणि त्यामध्येच तुम्हाला समजेल की मलेरिया आहे की नाही.
मलेरिया किंवा हिवताप वर उपचार काय आहेत ?
(Maleria Kai aahe) जसे की मी सांगितले की जर का तुमचा ताप तुम्हाला असह्य होत असेल तर जवळच्या रुग्णालयात जाऊन Blood Test करा. तुमच्या रिपोर्ट मध्ये मलेरिया आढळ्यास तुम्हाला त्वरित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जाईल.
एकदा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालात की तुम्हाला रोगप्रतिकारक आणि मलेरिया च्या संक्रमणाला टिकण्यासाठी औषधे देण्यात येतील. काही दिवस त्रास होईल पण लवकरच तुम्हाला बरे वाटायला चालू होईल.
जर पहिल्या रक्ताच्या नमुन्यात कोणताही परजीवी सापडत नसेल, तर 6 ते 12 तासांच्या अंतरावर रक्ताचे नमुने पुन्हा पुन्हा घेऊन अतिशय काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक असते. ज्या निदान केंद्रांमध्ये मलेरियाची मायक्रोस्कोपी उपलब्ध नाही किंवा विश्वासार्ह नाही, तिथे मलेरियाचे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट उपयुक्त ठरू शकतात. जर प्रयोगशाळेतील अहवाल यायला वेळ लागत असेल, तर रुग्णाचे लक्षणे आणि प्रवासाचा इतिहास मलेरियाकडे निर्देश करत असेल, तर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करावेत.
लक्षात ठेवा – (Maleria Kai aahe) मलेरिया हा इतका घातक आजार आहे की त्याने तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणून डॉक्टरांशिवाय कोणत्या ही दुसऱ्या लोकांची मदत घेऊ नका. कमी पैसे जातील म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणाकडून पण उपचार करणार तर ते महागातचच पडेल.
मलेरिया चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे ?
- (Maleria Kai aahe) जसे मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला मलेरिया झाला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण ह्या गोष्टीचा म्हणचे ज्या मच्छरांमुळे हा रोग पसरत आहे त्याच्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही केले पाहिजे म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला हा आजार होणार नाही.
- तर सर्वात प्रथम तुमच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
- पाणी उकळून प्या
- आपल्या आजुबाजूला कुठे पण साचलेले पाणी असेल तर त्या पाण्याला सर्वात पहिले काढून टाका आणि ती जागा स्वच्छ पुसून घ्या, कारण साचलेल्या पाण्यात सर्वात जास्त हे मच्छर जन्माला येतात.
- रात्री झोपताना मच्छरदाणी चा वापर करा.
- डासांची पैदायीश जर का जास्तच होत असेल तर आपण आपल्या जवळच्या नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकता. जेणे करून ते तुमच्या विभागामध्ये कीटकनाशक फवारणी करतील. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या नगरपालिका ला भेट द्या.
मलेरिया चा शोध कोणी लावला ?
Sir Ronald Ross ( सर रोनाल्ड रॉस) यांनी मलेरिया चा शोध १८९७ मध्ये लावला. आणि त्यासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
जागतिक हिवताप मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय?
(Maleria Kai aahe) हा आजार इतका मोठा आहे की ह्यामुळे खूप लोकांचे जीव गेले. आणि ह्या रोगाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो.
ह्या माध्यमातून लोकांना ह्या आजाराबद्दल ची सर्व माहिती पुरवली जाते. हा आजार कसा होतो, त्याची लक्षणे काय, उपचार कुठे आणि कसा करावा, मलेरिया आहे हे कसे समजावे. आणखी खूप साऱ्या गोष्टी आपले सरकार ह्या दिवशी माहिती देत असते.
कोणत्याही आजाराशी लढण्याकरता वैद्यकीय सल्ल्याशी गरज लागतेच आणि औषध ही देखील लागतात पण त्या व्यतिरिक्त पण जे आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे आपली मानसिक स्थिती. जर का आपण आजारामध्ये आपली मानसिक स्थिती सकारात्मक दृष्टिकोनातून बघितली तर कदाचित तुम्हाला जिथे दहा ते पंधरा दिवस बरं होण्यासाठी लागेल ते कदाचित तुम्ही एका हप्त्यातच बरे व्हाल, पण जर का तुम्ही त्या आजाराला घाबरला तर पंधरा दिवसाच्या जागेवर महिना देखील लागू शकतो. आज तुम्ही कोरोना काळातली परिस्थिती पाहिली, कोरोना काळामध्ये खूप लोक नुसत्या भीतीपोटी त्यांनी त्यांचे जीव गमावले. त्यामुळे संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन या दोघांचा वापर करून तुम्ही पाहिजे त्या आजाराला हरवू शकता.
अनुभवाच्या पावसातून आलेली समज
गावात एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला, एका संध्याकाळी अचानक माझ्या लहान भावाला थंडी, ताप, आणि अंगदुखी सुरू झाली. सुरुवातीला वाटलं की, साधा सर्दी-खोकला असेल, पण दोन दिवसात त्याचा ताप १०३ च्या वर गेला. डॉक्टरांकडे नेल्यावर समजलं की, त्याला मलेरिया झाला आहे. डॉक्टरांनी एकदम थेट सांगितलं, “हे मलेरियाचं लक्षण आहे, आणि वेळ वाया घालवण्यासारखी परिस्थिती नाही.” ही वेळ माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होती. ताप, अंगदुखी, डोकं गरगरणं, आणि दर तासाला येणारी थंडी या सगळ्या त्रासांमुळे त्याचं अंग अक्षरशः थरथरत होतं. या काळात आम्ही जाणलं की मलेरिया म्हणजे केवळ एक ताप नाही; हे एक जीवघेणं संक्रमण आहे जे शरीराला आतून पोखरतं. त्या रात्री मला पहिल्यांदाच समजलं की, एक छोटीशी चूक म्हणजे घराभोवती पाण्याची साठवणूक इतकी मोठी परिणामकारक ठरू शकते.
उपचारांची वाट आणि घरगुती जपणूक
तपासणीतून P. vivax या प्रकाराचा मलेरिया असल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांनी औषधं सुरू केली मुख्यत्वे antimalarial गोळ्या, रक्तातील संक्रमण कमी करणारं औषध, आणि थकवा कमी करण्यासाठी घरगुती उपायसुद्धा. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसायला लागलं. हे सगळं अनुभवल्यावर माझं मन म्हणालं, “आरोग्य ही खरंच खरी संपत्ती आहे.” डॉक्टरांचं वेळेवर निदान, औषधं वेळेवर घेणं, आणि घरच्यांचं मोलाचं साथ या त्रिसूत्रीने त्याला या आजारातून सावरलं. मलेरियावर मात करायची असेल, तर केवळ औषधं नव्हे, तर सकारात्मक मानसिकता आणि कुटुंबाचा आधार हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रतिबंध म्हणजेच सुरुवातीला जिंकलेली लढाई
या सगळ्यानंतर मी ठरवलं की, फक्त उपचारच नव्हे तर मलेरियाचा प्रतिबंध करणं हे आपलं रोजचं काम असायला हवं. मी आणि माझ्या आईने घरासमोरील पाण्याचा खड्डा बुजवला, दर रविवारी घराच्या भोवताली फिनाईल टाकायला सुरुवात केली, आणि प्रत्येक झोपताना मच्छरदाणी वापरणं बंधनकारक केलं. मी कामावरून परत आल्यावर थकलेलो असलो तरी उघड्या पाण्याच्या बाटल्या आणि भांडी झाकून ठेवतो. कारण मला समजलं आहे मलेरिया थांबवायचा असेल, तर आधी मच्छर थांबवा. शाळांमध्ये, वाड्यांमध्ये, अंगणात… सगळीकडे मलेरियाबाबत जागरुकता निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे. फक्त सरकार नव्हे, तर सामान्य माणसाच्या छोट्या कृतीमधूनही मोठा फरक घडतो. शेवटी, जर आपण घरात आरोग्य राखलं, तर रुग्णालयं दूर ठेवणं शक्य आहे. आणि हे मी फक्त बोलून नाही सांगत मी ते स्वतः अनुभवलं आहे.
निष्कर्ष:
मलेरिया ही केवळ एक आजार नाही ती एक शिकवण आहे. ती आपल्याला सांगते की, छोट्या सवयींमध्ये मोठी सुरक्षितता लपलेली आहे. वेळीच काळजी घेणं, स्वच्छता राखणं, आणि शरीराची सिग्नल्स ऐकणं हे सगळं आपल्याला या आजारापासून दूर ठेवू शकतं. तुम्ही आजच ठरवा घरासमोरचं पाणी साचणार नाही, मच्छरदाणी वापरायचीच, आणि कोणालाही ताप आला तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जायचं. हे छोटे छोटे पावलं आयुष्य वाचवू शकतात.
तुमचं आरोग्य, तुमचं भविष्य तेच तुमचं खरं संपत्ती आहे. 🌱
हे कोणासोबतही होऊ नये यासाठी मी हा Blog लिहिलेला आहे.
आम्हाला नक्की सांगा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तेही जरूर कळवा! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत.