
Table of Contents
Yoga ani Pranayam रोजच्या भागादोड च्या जीवनामध्ये निरोगी राहणे हे खूप मोठी समस्या झाली आहे. अर्धे आयुष्य हे फक्त काम करण्यामध्ये जाते. वरुण आपली लाईफस्टाईल पण खराब होत चालली आहे. जसे की बाहेरचे जंक फूड खाणे वैगरे. ह्यामुळे खूप लोकांना हार्ट अटॅक पण आला आहे. तर निरोगी राहणे आणि आपली चांगली लाईफस्टाईल जपून ठेवणे हे सध्याच्या काळात एक मोठी आव्हान आहे. पण काही असे उपाय आहेत जे तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या आंतरिक शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतील. ते म्हणजे योग आणि प्राणायाम.
योग आणि प्राणायाम (Yoga ani Pranayam) काय आहे ?
ही एक प्राचीन भारतीय पद्धत आहे. आता जवळपास बाहेरच्या खूप देशांनी आपली ही पद्धत अमलात आणली आहे कारण त्यांना देखील हे समजले की योगाभ्यासाने खूप काही मिळवू शकतो.
योगाभ्यासाने चे परिणाम ?
(Yoga ani Pranayam) योगाभ्यास असा अभ्यास आहे की ज्याने तुम्ही काही गोष्टींचे अभ्यास करून किंवा काही योग शिकून तुम्ही तुमचे मानसिक , आत्मिक आणि शरीर ला संतुलित करू शकता. तुम्ही हे सर्व व्यायाम करून सुद्धा मिळवू शकता पण सर्वात मोठे आहे मानसिक शांतता जी तुम्हाला फक्त आणि फक्त योगाभ्यानासे च मिळू शकते.
ह्या लेखा मध्ये आपण जाणून घेऊया १० योग आणि प्राणायाम बद्दल जे तुम्हाला तुमची रोजच्या दिनचर्यासाठी मदत करतील. आणि मी तुम्हाला खरच सांगतो मी जे काही सांगणार आहे त्यापैकी एक पण तुम्ही योगाभ्यास चालू केलात तर तुम्ही काही दिवसांनी ह्याच लेखा वर कमेंट करताल की लाईफमध्ये खूप बदल झाला.
योग आणि प्राणायाम चे फायदे जी फक्त शरीर नाही मन पण स्वस्त राहण्यास मदत करते.
खूप लोक योग ला फक्त एक व्यायाम समजतात पण हे त्यापेक्षा पण खूप मोठे आहे. योग एक जीवनशैली आहे. ह्याचे लाभ खूप आहेत ज्याने योगाभ्यास चालू केला तो कधीच परत हे सोढू शकत नाही. कारण त्या व्यक्ती la ह्याचे फायदे समजून आले आहेत.
(Yoga ani Pranayam) योगाभ्यास चे लाभ काय आहेत ?
- मानसिक तणाव आणि चिंता दूर करणे.
- झोपण्याची गुणवत्ता सुधारणे.
- आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते .
- हृदय, फुपुसे आणि पचन शक्ती वाढवायचे काम करते.
- वजन नियंत्रित करते.
- आत्मा संतुलन आणि ध्यान मध्ये वृद्धी होते.
(Yoga ani Pranayam )चला समजून घेऊ १० योगाभ्यास जे खूप प्रभावी आहेत.
1. ताड़ासन (Tadasana ) – स्थिरता देण्यासाठी
नावावरून समजले असेल की हे आसन शरीराल स्थिरता प्रदान करण्यात मदत करत. तुमच्या शरीरामधील रीड ची हद्दी ला सरळ आणि मजबूत ठेवण्यासाठी मदत करते.
2. वृक्षासन हे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करते.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकाग्रतेची गरज लागते आणि ते ह्या आसना मधून तुम्हाला मिळू शकते. कोणताही गोष्टींमध्ये एकाग्र होण्यासाठी किंवा कार्य सफल करण्यासाठी एकाग्रतेची गरज लागते त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला हा आसन रोजच्या जीवनामध्ये करणे उपयोगी ठरेल.
3. भुजंगासन – कमरेचा दुखणं कमी करण्यासाठी
ह्या आसनाला कोबरा पोट सुद्धा म्हटले जाते कारण ह्यामध्ये शरीर हे एका सापासारखं चुकले जाते. हे असं कमरेच्या रीडच्या हद्दीला एकदम लक्ष्मीला बनवते आणि जर का कमरेमध्ये काहीही दुखणे असेल किंवा पोट साफ होत नसेल तर त्यासाठी हा एक उत्तम योगासन आहे.
4. पश्चिमोस्तने — तणाव दूर करण्यासाठी
हा एक घरी बसून करणाऱ्या योगासन आहे ज्याच्यामध्ये पोट जांक आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. हे असं पचनक्रिया सुधारण्यामध्ये मदत करते त्याबरोबर पोटाची चरबी कमी करण्यासाठ मदत करते.
5. अधोमुख श्वानासन (Adho Mukha Svanasana) – शरीराला ऊर्जा देण्यासाठी.
हा योगासन रक्त संचार वाढवण्यासाठी केला जातो. हे असं शरीराला थकावट पासून दूर ठेवण्यासाठी आणि शरीराला एक महत्त्वची ऊर्जा देण्यासाठी केला जातो.
6. कपालभाती योगासन – शरीराला डिटॉक्स करण्या साठी
ह्या प्राणायामाला ब्रिथिंग एक्सरसाइज पण म्हटले जाते. हे प्राणायाम शरीरामधील विषल्हे तत्त्व बाहेर काढण्यासाठी केला जातो ज्याच्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आपल्या फुफुसांची पण क्षमता वाढवण्यासाठी याचा अभ्यास केला जातो.
7. अनुलोम विलोम – दिवसाची दिनचर्या करण्यासाठी
हा प्राणायाम मनाला स्थित आणि आपल्या नाडी ला शुद्ध करण्यासाठी आहे. हा एक साधा सोपा योगासन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रित करू शकता आणि मानसिक स्थिती वाढवू शकता.
8. भ्रामरी प्राणायाम – शांत मनाचे सूत्र
हा प्राणाया मानसिक तणाव दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये हनी बीज म्हणजेच मधुमक्खी च्या आवाजात सारखा एक ध्वनी निर्माण होतो जे मस्तिष्क ला एकदम शांत ठेवून तुमच्या झोपण्याची क्षमता किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करते.
9. उज्जायी प्राणायाम- शरीरामध्ये ऊर्जेसाठी
हा प्राणायाम शरीराला गरम आणि ऊर्जावान बनवतो. गळ्यामध्ये श्वास घेणे आणि सोडण ही प्रक्रिया आहे. तुमची मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास वाढतो.
10. नाडी शोधन प्राणायाम — अंतरिक सफाई करण्याकरता
हा प्राणायाम शरीरा ची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नाडी सफाई करण्यासाठी मदत करतो. याने ध्यान एकाग्र होते आणि मानसिक संतुलन व्यवस्थित करण्यास मदत करते ज्याने तुम्हाला आंतरिक शांती मिळण्यास मदत होते.
खरं सांगायचं तर, योग आणि प्राणायाम या गोष्टी आधी फारशा कधी गांभीर्यानं घेतल्या नव्हत्या. पण जेव्हा आयुष्यात सतत थकवा वाटायला लागला, झोप चांगली लागत नव्हती, आणि मनही उगाच अस्वस्थ राहायचं, तेव्हा एका मित्राने सहज म्हटलं – “दररोज थोडा वेळ फक्त स्वतःसाठी दे. योग करून बघ.” खरं सांगायचं तर सुरुवातीला फार फरक जाणवला नाही, पण काही आठवड्यांत लक्षात आलं की शरीर जरा हलकं वाटतंय, आणि मनही शांत झालय. ती पहाटची शांत वेळ, अंगावर येणाऱ्या मंद झुळुकीसारखी वाटणारी प्राणायामाची प्रत्येक श्वासोच्छ्वास – हे सगळं मनात घर करत गेलं. आताशा वाटतं, आपण आपल्या शरीराला आणि मनाला इतकं वर्ष दुर्लक्षित केलं, पण योगानं पुन्हा एकदा आपल्याशी आपलीच ओळख करून दिली.
प्राणायाम करताना मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यातून मिळणारी आंतरिक ऊर्जा. पूर्वी दिवसभर कामात दमल्यावर रात्री अंगात त्राण नसायचं. पण रोज सकाळी ५-१० मिनिटं अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी केल्यावर शरीराचा राग, चिडचिड, थकवा, सगळंच कुठे विरघळून गेल्यासारखं वाटतं. माझ्या आईचं एक वाक्य कायम लक्षात राहिलंय – “श्वास नीट घेतला की अर्धा आजार निघून जातो.” आणि खरंच, आता जेव्हा दिवसाची सुरुवात शांत मनाने होते, तेव्हा दिवसभर जास्त स्पष्ट विचार करता येतो, निर्णय योग्य घेता येतात. आणि हो, शरीरातली छोटी-मोठी दुखणी जशी हळूहळू कमी झाली, तसंच आयुष्यातला दृष्टिकोनही बदलला.
आजही आपण फोनमध्ये व्यस्त, धावपळीच्या दुनियेत हरवलेलो असतो. पण थोडा वेळ स्वतःसाठी काढणं – तेही कोणत्याही मशीनशिवाय, कोणत्याही मोठ्या खर्चाविना – ही गोष्ट आपण विसरत चाललोय. फॅन्सी आसने न करता फक्त योग्य पद्धतीने साधे आसन आणि श्वासावर लक्ष केंद्रीत केलं, तरी शरीर आणि मन दोन्ही बदलायला वेळ लागत नाही. माझा अनुभव सांगतो, हे केवळ व्यायाम नाही – ही एक शिस्त, एक संवाद आहे स्वतःशी. आणि आयुष्यात जर खरोखर काहीतरी बदल घडवायचा असेल, तर योग ही एक अत्यावश्यक सुरुवात ठरते.
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत योगाचा श्वास
आजचं जीवन हे सतत घड्याळाकडे पाहत जगण्याचं बनलंय. सकाळी उठलं की काम, जबाबदाऱ्या, सोशल मीडियाचं अविरत स्क्रोलिंग आणि या सगळ्या गर्दीत स्वतःसाठी वेळच राहत नाही. पण एक दिवस, सकाळी लवकर उठून बाल्कनीत शांत बसलो, तेव्हा मनात एकच विचार आला “कधी आपण शेवटचं स्वतःशी गप्पा मारल्या होत्या?” आणि तिथून सुरू झाली माझी योगाशी ओळख. सुरुवातीला फक्त अंग हलकं वाटावं म्हणून योग केलं, पण हळूहळू त्याचा प्रभाव मनावरसुद्धा जाणवायला लागला. नुसता वज्रासन किंवा ताडासन करतानाच नव्हे, तर श्वासोच्छ्वासांवर लक्ष केंद्रित करताना जाणवलेली आतली शांतता ती खूप काही शिकवून गेली.
प्राणायाम म्हणजे शरीराची सफाई आणि मनाचा आधार
प्रत्येक दिवशी अनुलोम-विलोम, कपालभाती, आणि भ्रामरीसारखे प्राणायाम करताना असं वाटायला लागलं की आपण आपल्या शरीराशी आणि मनाशी संवाद साधतोय. पूर्वी थोडं चाललं तरी दम लागायचा, पण आता दिवसभर काम करूनही संध्याकाळी उत्साह असतो. झोपही गाढ लागते आणि सकाळचं उठणं त्रासदायक वाटत नाही. माझ्या आईनं एकदा सांगितलं होतं “स्वतःच्या श्वासाशी मैत्री कर, मग सगळं सोपं वाटेल.” खरंच, प्राणायाम ही केवळ श्वसन क्रिया नाही; ही एक प्रक्रिया आहे जी तुमच्या आंतरिक स्वच्छतेकडे नेते. अन्नपचन सुधरतं, त्वचेला तेज येतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन स्थिर होतं. हे अनुभवताना असंही जाणवलं की, शरीरात निर्माण होणारा ताण, राग, चिंता हे सगळं श्वासांमध्ये विरघळून जातंय.
योग: आपल्या आयुष्याचं आपलंच उत्तर
आज जगात अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत तंत्रज्ञान, कामाचे तास, समाजातील अपेक्षा पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे, ती म्हणजे ‘शांततेची गरज’. आणि ही शांतता कुठल्याही ॲपमध्ये नाही, ती आपल्या श्वासात, आपल्या ध्यानात, आणि आपल्या साध्या आसनात लपलेली असते. मला आता असं वाटतं, की आपण जग जिंकण्याच्या नादात स्वतःकडेच दुर्लक्ष केलं. योगाने ते दुर्लक्ष ओळखायला शिकवलं. त्यामुळे मी दररोज निदान २० मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवतो. त्यावेळी ना फोन, ना विचार फक्त मी आणि माझा श्वास. आणि ही सवय केवळ आरोग्य सुधारते असं नाही, ती आयुष्य जगण्याचा दृष्टिकोनच बदलते.
निष्कर्ष :
(Yoga ani Pranayam) योग आणि प्राणायाम हा काही लगेच होणारे उपाय नाही आहेत. पण ते जीवन जगण्यासाठी शांत राहण्यासाठी आणि जीवनाला संतुलित ठेवण्यासाठी एक उपाय आहे. तुमच्या दिवसाचे सुरुवात 20 ते 30 मिनिटं लोक आणि प्राणायाम याने करावा जेणेकरून तुम्ही नाऱ्या आजारांपासून लांब राहू शकतात आहे तुमची मानसिक स्थिती वाढवण्यासाठी मदत मिळेल.
सुरुवात नेहमी साध्या सरळ असणानें करावी. शरीराच्या क्षमतेला समजून घ्यावे आणि जर का जरुरत असेल तर गुरुच्या माध्यमातून किंवा गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योगा अभ्यासाची शैली शिकू शकता.