
Table of Contents
ग्रीन टी (Green Tea) चे बेनिफिट म्हणजेच फायदे
Green Tea : तर आज मी तुम्हाला ग्रीन टी च नैसर्गिक फायदे आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे चांगले परिणाम याबद्दल माहिती देणार आहे
ग्रीन टी हे आपल्या मेटाबोलिजम म्हणजेच की आपण जे काही दिवसभरामध्ये अन्नप्राशन करतो ती केल्यानंतर पचन शक्ती वाढवायचे काम करते. हे वाढल्यामुळे तुमचे शरीरातले बरेचस आजार कमी होतात जसे की तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला खूप सारे आजार हे फक्त पोटाच्या त्रासामुळे होतात
ग्रीन टी चा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे क्रॉनिक डिसीज म्हणजे तुमचे ह्रदयविकार, मेंदूचे आजार हे देखील ग्रीन टी न खूप काही प्रमाणामध्ये कंट्रोल मध्ये आणले जाऊ शकते.
तर ग्रीन टी मध्ये असा काय पदार्थ आहे किंवा ग्रीन टी का हे फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडन्स.ग्रीन टी च्या पोषकतत्वा मुळे दिवसभर आपल्याला फ्रेश राहायला मदत मिळते.
Antioxidant काय आहे ?
आपल्या शरीरामध्ये फ्री radicals म्हणजेच काही अणू आहेत जे आपले सेल्स damage करतात, आणि त्या सेल्स ला रिकवर करण्यासाठी तुम्हाला काही medicines ची गरज असते. पण हे जर का तुम्हाला medicines न घेता सेल्स la recover करायचे असेल तर antioxidant कामाला येते. ग्रीन टी (Green Tea) मध्ये antioxidant चा खूप चांगला स्तोत्र आहे. तुमचे Damage सेल्स Recover झाले तर खूप काही आजारापासून तुम्ही लांब राहू शकता.
ग्रीन टी (Green Tea) पिल्यामुळे फॅट बर्न होते का?
जसे की ग्रीन टी हे खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी. रोज ग्रीन टी चे सेवन केल्याने तुमचे Metabolism वाढते. Metabolism वाढल्या ने तुमच्या शरीरामधील Calories बर्न होयला चालू होतात. ग्रीन टी हा एक पर्याय असु शकतो पोटाची चरबी कमी करण्यासाठी. आता काही रिसर्च मध्ये असे दिसून आले आहे की ग्रीन टी सोबत रोज व्यायाम करत असाल तर हे तुमच्या शरीरामधील Fats म्हणजे चरबी खूप प्रमाणात कमी करू शकते.
ग्रीन टी (Green Tea) कोणत्या वेळेस प्यावी? सकाळी की रात्री?
खरे तर तुम्ही ग्रीन टी कधी पण पिऊ शकता. पण एका रिसर्च अनुसार ग्रीन टी हे व्यायाम करण्याच्या १.५ तास अगोदर प्यावे. असे केल्याने तुमची Metabolism वाढते आणि तुमच्या शरीराला एक Engry मिळते आणि त्यानंतर व्यायाम केलात तर खूप तीव्र गतीने चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
ग्रीन टी (Green Tea) चे Side Effects आहेत का?
आतापर्यंत आपण ग्रीन टी (Green Tea) चे फायदे बघितले आता आपण त्याचे Side Effects बघू.
कोणती ही गोष्ट प्रमाणात केली तर त्याचे नेहमी फायदेच बघायला भेटतात पण जर का प्रमाणाच्या बाहेर केली तर म खूप साऱ्या व्याधी ना सामोरे जावे लागते.
तर हो ग्रीन टी चे side effects आहेत कारण ग्रीन टी मध्ये Caffine आणि Tanin नावाचे compound असतात. हे compound तुमच्या शरीरासाठी जितके चांगले आहेत तितके वाईट पण आहेत. एका सर्वे नुसार दिवसभरात तुम्ही ३ – ४ कप ग्रीन टी पिऊ शकता. पण खूप जास्त प्रमाणात आपण प्यायला तर म हलके डोके दुखेल किंवा पोटामध्ये गडबड होईल. काही केसेस मध्ये लिव्हर सुद्धा damage होण्याची शक्यता असते.
ग्रीन टी (Green Tea) कशी बनवायची ?
ग्रीन टी (Green Tea) बनवण्यासाठी काही अधिक सामग्री ची गरज नाहीय. ग्रीन टी हे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती च्या पानांना सुकवून बनवले जाते.
तर ग्रीन टी कशी बनवायची, सर्वात प्रथम मार्केट मधून ग्रीन टी विकत घेऊन या. ग्रीन टी चे हेल्थ बेनिफिट बघून मार्केटमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ग्रीन टी आल्या आहेत. तुम्हाला जी योग्य वाटेल किंवा जो flavour आवढतं असेल तो विकत घ्या. त्यामध्ये ग्रीन टी चे पाउच असतील. एक पाउच घ्या आणि गरम पाणी करा. पाणी इतके गरम करा की तुम्ही पिऊ शकाल.
आता पाणी गरम झाले की एक कप मध्ये तुम्ही गरम पाणी घाला आणि त्यामध्ये ग्रीन टी चे पाउच टाका. थोडा वेळ त्या पाउच मधला flavour त्या पाण्यामध्ये मिसळून जाऊदे. अशाप्रकारे सध्या सरळ पद्धतीने तुमची ग्रीन टी तयार झाली की हळूहळू त्याचा आस्वाद घ्या.
अनेक लोकांना चहा पिण्याची सवय इतकी लागलेली असते की चहा न मिळाल्यास त्यांचा दिवस सुरूच होत नाही. ही सवय इतकी बळकट असते की ती व्यसनासारखी वाटते. पण हे लक्षात घ्या की चहा आरोग्यासाठी फारसा चांगला नाही. तुम्ही चहा ऐवजी ग्रीन टी घेण्याचा विचार केला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकरच जाणवतील. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यासाठी आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आपल्या दैनंदिन सवयींमध्ये थोडेसे बदल करणे आवश्यक आहे.
तुम्ही एकदा ग्रीन टी पिऊन बघाच आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे आम्हाला नक्की सांगा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तेही जरूर कळवा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
ग्रीन टी बद्दल डॉक्टर काय म्हणतात?
आपण ग्रीन टीबद्दल अनेकदा ऐकत असतो – कुणी म्हणतं वजन कमी होतं, तर कुणी सांगतं त्वचा उजळते. पण खरं सांगायचं झालं, तर डॉक्टरांचं या सगळ्यावर वेगळंच मत असतं. बरेच वैद्यकीय तज्ज्ञ असं सांगतात की, ग्रीन टी हा एक नैसर्गिक उपाय आहे जो शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो. पण त्याचा उपयोग प्रत्येकासाठी सारखाच असतो असं नाही. काही लोकांना अॅसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी असतील, तर त्यांनी ग्रीन टी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर हे देखील सांगतात की, ग्रीन टी एक ‘सपोर्टिव्ह’ पेय आहे – म्हणजे एकट्याने तो सगळ्या त्रासांवर उपाय करत नाही, पण चांगल्या जीवनशैलीसोबत त्याचा उपयोग नक्कीच होतो.
ग्रीन टी चांगला आहे की वाईट?
हा प्रश्न खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर, वयावर आणि सध्याच्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा, तर ग्रीन टी घेण्यामुळे दिवसभर हलकं वाटतं, थकवा कमी होतो आणि पचन थोडं सुधारतं. पण सुरुवातीला मला त्याची चवच रुचली नाही. काही जणांना मात्र यामुळे झोपेच्या वेळा बिघडतात किंवा पोटात जळजळ होते. त्यामुळे कोणासाठी ग्रीन टी चांगला, कोणासाठी वाईट हे समजून घेणं गरजेचं आहे. ग्रीन टी हा एखाद्या चमत्कारी औषधासारखा नाही, पण तो चांगल्या आरोग्यविषयी सजग राहण्याचा एक भाग होऊ शकतो.
कोणता चहा आरोग्यासाठी चांगला आहे?
आजकाल बाजारात असंख्य प्रकारचे चहा उपलब्ध आहेत – ग्रीन टी, ब्लॅक टी, हर्बल टी, व्हाईट टी… प्रत्येकाच्या फायद्यांचे दावेही वेगवेगळे. पण यामध्ये कोणताही चहा आपल्यासाठी चांगला आहे का, हे आपल्या गरजांनुसार ठरतं. वजन कमी करायचं असेल तर ग्रीन टी चालतो, पण तणाव कमी करायचा असेल तर हर्बल टी अधिक फायदेशीर ठरतो. डॉक्टरही असं सुचवतात की, ‘ज्या गोष्टीमुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही सुसंगत राहतं, तीच योग्य’. त्यामुळे कुठलाही ट्रेंड न पाहता, स्वतःच्या अनुभवावर आणि शरीराच्या प्रतिक्रियेवर आधारित निर्णय घेणं सर्वात चांगलं.
ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करू शकते का?
हो, ग्रीन टीमधील कॅटेचिन आणि कॅफिन हे घटक चयापचय (metabolism) वाढवतात, हे संशोधनाने सिद्ध झालं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे – ग्रीन टी वजन कमी करण्याचं जादुई पेय नाही. तुम्ही जर फक्त ग्रीन टी पित असाल आणि खाण्यापिण्याची काळजी घेत नाही, नियमित व्यायाम करत नाही, तर वजन काही कमी होणार नाही. माझ्या अनुभवात, सकाळी ग्रीन टी पिणं, दिवसात भरपूर पाणी घेणं आणि घरचं साधं जेवण यामुळे माझं वजन हळूहळू पण स्थिर कमी झालं. त्यामुळे, ग्रीन टी ही प्रवासाची सुरुवात होऊ शकते, पण पूर्ण मार्ग नव्हे.
ते ग्रीन टी बद्दल काय म्हणतात?
बरेच आहारतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ ग्रीन टीला ‘स्वास्थ्यवर्धक पेय’ असं संबोधतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा, पचन आणि मानसिक स्वास्थ्य यासाठी उपयोगी ठरतो असं ते सांगतात. काही तज्ज्ञ असं देखील म्हणतात की, दररोज २-३ कप ग्रीन टी पिणं सुरक्षित आहे, पण त्याहून अधिक घेतल्यास झोपेच्या वेळा बिघडू शकतात. मीही हे स्वतः अनुभवलं आहे – एकदा संध्याकाळी उशिरा ग्रीन टी घेतली आणि रात्री झोप येईचना. त्यामुळे योग्य वेळ आणि प्रमाण हे ग्रीन टी घेताना सर्वात महत्त्वाचं. शेवटी ग्रीन टी हा सगळ्यांच्या जीवनशैलीत एक सहज समावेश होणारा आणि आपल्या आरोग्याला एक सकारात्मक दिशा देणारा छोटासा पण प्रभावी सवय आहे.
Thanks
Good informetion I will tell my grandson about this
Thank you so much! 😊 Glad you found it helpful. I’m sure your grandson will appreciate this valuable information too! 💛✨