ITR Filing 2024 : फॉर्म 16 येईपर्यंत वाट पाहत बसू नका – काही आवश्यक कागदपत्रं आधीच तयार ठेवून प्रक्रिया सुलभ करा!

ITR Filing 2024

ITR Filing 2024 म्हणजेच इन्कम टॅक्स भरणे. पण आपण दरवर्षी Form 16 ची वाट बघत असतो.  मी स्वतः वाट पाहत असतो कारण Form 16 शिवाय तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकत नाही. आर्थिक वर्ष संपल्यानंतर कंपनीकडून दिला जाणारा फॉर्म 16 हा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्याच्या मदतीने तुमचं उत्पन्न आणि कर यांची माहिती सहज समजते, जी ITR भरताना खूपच उपयोगी पडते. पण आज मी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नवीन अपडेट देणार आहे.

इतर 2024 साठी तयारी करत आहात का ?


ITR Filing 2024 ला घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने काही नवीन नियम लागू केले आहेत. आता ITR भरण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, त्यासाठी एक नवा फॉर्म सादर करण्यात आला आहे. विशेषतः कॅपिटल गेनशी संबंधित काही नवे नियम आणि सुधारणा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

हे जरी असले असेल तरी काही utilities आणि Form 16 हे अजून ऑनलाईन भरण्यासाठी आले नाहीय. त्यामुळे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही आताच जमा करायला चालू करा.ह्या आर्टिकल मधून आपण हेच जाणून घेणार आहोत की ITR मधून कोणता फॉर्म निवडायचा, कोणत्या अश्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि काय महत्वाचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे आपल्या जवळ पाहिजे जेणेकरून जेव्हा पण तुम्ही ITR Filing करायला जाणार तेव्हा कोणत्याही अडथळेशिवाय तुम्ही लगेच आपला टॅक्स फाइल करू शकता.

प्रत्येकाला वाटते की income tax filing ची अखेरची तरी ही दरवर्षी 31 जुलै असते. आणि दरवर्षी आपण अखेरच्या वेळेस खूप काही चुका करून बसतो त्याने कदाचित आपल्याला जास्त टॅक्स भरावा लागला असेल. जे की खरे आहे पण आपण आता पासून जर का तयारीत राहिलो तर मला वाटत नाही की तुम्हाला fililng करायला काही अडथळा निर्माण होईल.

जसे की म्हटले ITR फॉर्म मध्ये कॅपिटल गेन ला घेऊन काही फेरबदल करण्यात आले आहे. आणि नंतर अचानक समजले तर खूप चुका होण्याच्या संभावना आहेत. अजून पर्यंत हा फॉर्म ऑनलाइन नाही आहे. खूप लोकांना अजून त्यांच्या कंपन्यांकडून Form 16 भेटलेला नाही म्हणूनच महत्त्वाचे कागदपत्रे जमा करूया आणि चुका होण्यापासून वाचू.

बरोबर ITR Form निवडणे फार महत्त्वाचे


ITR Filing 2024: सर्वात प्रथम, तुम्हाला समझने गरजेचे आहे की कोणता ITR फॉर्म निवडायचा. आता नवीन नियमानुसार कॅपिटल गेन साठी तुम्ही ITR1 ची निवड करू शकता. पण ह्यामध्ये काही कंडीशन आहेत, उदाहरणार्थ कॅपिटल गेन हे शेअर च्या खरेदी आणि विक्री च्या नफ्या वर लावली जाते. जर का तुमच्या पूर्ण वर्षभराचा कॅपिटल गेन हा 1.25 लाखापेक्षा कमी आहे आणि तुम्हाला कोणताही पहिले झालेले नुकसान कॅरी फॉरवर्ड नसेल करायचे तर तुम्ही ITR1 हा फॉर्म निवडा. लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की तुम्ही चुकून चुकीचा फॉर्म निवडला तर त्या फॉर्म ला रद्द केलं जाईल.

ITR Filing साठी महत्वाची कागदपत्रे


ITR Filing 2024 ची फाईल करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्रे पाहिजे आहेत. खाली दिलेले कागदपत्रे जमा करायला चालू करा.

  • बँक अकाउंट डिटेल्स
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर
  • Form 16
  • पगाराची स्लिप (Salary Slip)
  • भाड्याचे अग्रीमेंट
  • वार्षिक स्टेटमेंट
  • TDS सर्टिफिकेट (Form 16A/16B/16C)
  • Form 26AS

कोणता TAX Regime निवडायचा


ITR Filing 2024 : हे समजून घेणे गरजेचे आहे की कोणता ही टॅक्स पेयर हा आपला tax regime हा filing केल्यानंतर ही बदलू शकतो. जसे की तुम्हाला माहिती असेलच की १ फेब्रुवारी ला टॅक्स स्लॅब हा बदली होऊन १२ लाख झाला आहे. म्हणजेच १२ लाख पर्यंत आता तुम्हाला tax भरावा लागणार नाहीय. म्हणूनच अनेक करदाते असे आहेत ज्यांना नवीन टॅक्स रेजीम अधिक सोपी आणि फायदेशीर वाटत आहे. ज्यामध्ये त्यांना tax भरायला येणार नाही. पण माझे स्वतःचे असे म्हणणे आहे की प्रत्येकाने आपापली आर्थिक स्थिती पाहून tax regime निवडावा.

Investment प्रूफ ची गरज आहे tax Deduction साठी


ITR Filing 2024 : जर तुम्ही जुनी टॅक्स रेजीम निवडली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून अनावश्यक कर वजावट होऊ नये, तर वर्षभरात तुम्ही केलेल्या सर्व गुंतवणुकीची योग्य ती कागदपत्रं कंपनीकडे वेळेत जमा करणं गरजेचं आहे.

  • जर तुम्ही म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, NPS किंवा अशाच प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्या गुंतवणुकीसंदर्भातील पावत्या वर्षाअखेरीस नक्की घ्या. या गुंतवणुकीचा फायदा तुम्ही आयकराच्या सेक्शन 80C अंतर्गत घेऊ शकता. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या रकमेची गुंतवणूक केली आहे, त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही.
  • जर का तुम्ही काही मेडिकल पॉलिसी खरेदी केली असेल तर त्याचे बेनिफिट देखील तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला त्या मेडिकल पॉलिसी ची डिटेल्स सेक्शन 80D मध्ये द्यावी लागेल. मात्र, याचा लाभ घ्यायचा असेल तर वर्षभरात भरलेल्या गुंतवणुकीच्या पावत्या वेळेत सादर करणं गरजेचं असतं.
  • जर का तुम्ही घरासाठी काही कर्ज घेतले असेल तर तुम्ही त्याचे व्याजावर देखील क्लेम करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला बँकेकडून इंटरेस्ट पेमेंट सर्टिफिकेट घ्यावे लागेल.

अस्वीकरण:


या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. कर नियम आणि प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याआधी अधिकृत स्रोत किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीवरून घेतलेले कोणतेही आर्थिक निर्णय यासाठी लेखक किंवा वेबसाईट जबाबदार नाही.

आणखी वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *