म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक कशी करावी? | मराठीत संपूर्ण मार्गदर्शन 2025

Mutual Fund बद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. Mutual Fund हे एक निधी आहे ज्यामध्ये आपण दरमहा एक ठराविक रक्कम SIP किंवा Lumpsum ऑपशन च्या माध्यमातून टाकू शकत. लोकांनी गुंतवलेले पैसे एकदाच share Market मध्ये लावला जातो आणि जो काही नफा होईल सर्वांमध्ये सामान हिस्स्यात दिला जातो. तर चला मग जाणून घेऊ आणखी खूप काही.
Mutual Fund हे ( Asset Management Company ) असेट मानजमेंट कंपॅनिएस चालवतात. खूप साऱ्या अश्या कंपनीएस आहेत जिथे तुम्ही तुमचे Mutual Fund चालू करू शकता . असेट मानजमेंट कंपनी निवडताना त्याचा सर्वे बॅक रेकॉर्ड चेक केला जातो पण मी तुम्हाला आज एक सोप्पी पद्धत सांगणार आहे.

Mutual Fund म्युच्युअल फंड म्हणजे काय?

प्रतेय्क Mutual Fund हे वेग वेगळ्या कंपॅनिएस ने बनवलेले असते. उदारणार्थ कोणता एक Mutual Fund तुम्ही ओपन केलात तर त्या फंड च्या एंडिंग ला तुम्हाला समझेल कि त्या fund मध्ये किती कंपनीचे share आहेत. कोणतेही मुतुअल फंड हे १०-१५ कंपॅनिएस चे Shares एकत्र करून बनते. तुम्ही दरमहा जी काही गुंतवणूक करता ती सर्वे सामान पैस्या मध्ये त्या सर्वे Shares मध्ये गुतंवली जाते म्हणजेच तुम्ही कोणत्या हि Mutual Fund दरमहा ५००० रुपये जर गुंतवणूक करत असाल आणि त्या Mutual Fund जर का १० Shares ने बनलेला असेल तर तुम्हचे ५००० रुपये १० Shares मध्ये विभाजित केले जातील.
५०० रुपये प्रत्येक Shares मध्ये गुंतवणूक केली जाईल.

SIP किंवा Lumpsump म्हणजे काय ?

Mutual Fund मध्ये तुम्ही दोन पद्धतीने गुंतवणूक करू शकता.एक आहे lumpsump आणि दुसरी आहे SIP.

सिप म्हणजेच SIP. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). ह्या ऑपशन द्वारे तुम्ही ठरवलेली रक्कम दरमहा तुमच्या बँक अकाउंट मधून जात राहील आणि तुम्ही निवडलेल्या Mutual Fund मध्ये इन्व्हेस्ट होतील. ह्यासाठी तुम्हाला Mutual Fund सिलेक्ट करून SIP च्या ओप्टिव वर क्लिक करा म्हणजे SIP activate होईल. त्या साठी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या बँक डिटेल्स तुमच्या अकाउंट मध्ये टाका म्हणजे SIP सिलेक्ट केल्या नंतर ते लगेच तुमच्या बँक खात्याबरोबर जोडले जाईल.

गुंतवणूक (Investment ) कुठे करू शकतो ?

गुंतवणूक हि आजच्या काळाची गरज आहे पण पैसे कुठे गुंतवावा आणि जास्तीत जास्त नफा कुठून भेटेल ह्या सर्वे कारणामुळे खूप लोग कोणाच्या हि बोलण्यावर भरोसा ठेवतात आणि स्वतःची जन्माची कमाई गमावून टाकतात. आणि त्या मध्ये सर्वात जास्त योगदान हे शरमार्केट चे आहे. खूप लोग काही हि Share Market ची टीप देतात आणि लोकाना फसवतात.

पण तुम्ही लक्षात ठेवा Mutual Fund मधील पैसे देखील Share Market मध्येच लागतात. मग आपण कुठे पैसे टाकायचे हा विचार आलाच असेल ना ?
तर मी तुम्हाला सांगतो कि खूप सारे ब्रोकर आहेत मार्केट मध्ये पण तुम्हाला नेहमी ब्रोकर निवडताना त्याचे SEBI रेजिस्ट्रेशन झाले आहे का ते चेक करा.
ते झाले असेल तर तुम्ही त्या ब्रोकर कडे पैसे टाकू शकता. पण आज काळ Onlne ब्रोकर्स आहेत जे तुम्हाला २ मिनिट मध्ये अकाउंट ओपन करून देतील.

खाली दिलेले ब्रोकर्स हे SEBI रजिस्टर आहेत.

Groww
Zerodha
ET Money
५ Paisa
Angel Broking

तुमच्या गुंतवणुकीवर किती नफा होऊ शकतो ते पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Calculator चा वापर करू शकता

Calculator

त्यामुळे पैसे टाकताना खूप विचार करा आणि योग्य त्या व्यक्ती कडे गुंतवणूक करा.

दुसरी पद्धत आहे Lumpsump जिथे तुम्ही डायरेक्ट तुम्हाला वाटेल ती अमाऊंट तुम्ही कोणत्याही Mutual Fund मध्ये एकदाच भरू शकता. तुम्हाला दरमहा गुंतवणूक करण्याची गरज नाहीय.

SEBI म्हणजे काय ?

चला मग जाणून घेऊ कि SEBI काय असते . ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (Securities and Exchange Board of India). खरे म्हणायला गेले कि हि संस्था गुंतवणूकदार साठी बनवलेली आहे. जसे मी बोललो कि सर्वात जास्त फसवणूक हि Share Market मध्ये होते ती थांबवण्यासाटी आणि सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या संस्थेचा निर्माण झाला आहे. जेव्हा पण तुमच्या सोबत काही हि फसवणूक होते तेव्हा तुम्ही SEBI ला सांगू शकता. पण फक्त शरमार्केट च्या फसवणुकी बद्दल च त्यांच्याशी बोलू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गुगल फायनान्स म्युच्युअल फंड ट्रॅक करू शकते ?

तुम्ही गुगल फायनान्सवर तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड्सचे नाव किंवा ISIN कोड टाकून त्यांच्या मूल्याचा (NAV) इतिहास, परतावा, दररोजचा बदल आणि अनेक ग्राफिकल आकडेवारी पाहू शकता. यामध्ये “Follow” हे बटण वापरून फंड आपल्या ट्रॅकिंग लिस्टमध्ये जोडता येतो. मात्र, गुगल फायनान्स एक सिम्पल ट्रॅकर असून, त्यात तुम्ही केलेली वास्तविक गुंतवणूक, SIP तारीख, units अशा सखोल माहितीचा मागोवा ठेवता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला आपल्या गुंतवणुकीचा थेट मागोवा घ्यायचा असेल, तर Groww, Zerodha Coin किंवा INDmoney यासारख्या अॅप्स अधिक उपयुक्त ठरतात. गुगल फायनान्स हे फक्त प्रदर्शन (display) आणि अभ्यासासाठी उपयुक्त आहे, प्रत्यक्ष पोर्टफोलिओ ट्रॅकिंगसाठी ते पुरेसं नाही.

गुगलकडे फायनान्स ट्रॅकर आहे ?

पण तो पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ट्रॅकर नसून तो प्रामुख्याने माहिती आणि वॉचलिस्ट तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. हे टूल तुमच्या Google अकाउंटला जोडलेलं असतं आणि तुम्ही ज्या स्टॉक्स किंवा फंड्समध्ये स्वारस्य दाखवता त्यांना “Follow” करून वॉचलिस्ट तयार करू शकता. मात्र, यामध्ये SIP अलर्ट्स, ट्रांजॅक्शन हिस्टरी किंवा मूळ गुंतवणुकीचा परतावा अशा व्यावसायिक ट्रॅकिंग फिचर्सचा अभाव आहे. त्यामुळे Google Finance हा एक entry-level ट्रॅकर म्हणून उपयुक्त आहे, पण तुमच्या खऱ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तो एकटाच अपुरा ठरतो.

Gpay द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो का ?

या प्रश्नाचं उत्तर आहे – होय, करू शकतो. Gpay च्या “Wealth” किंवा “Investments” सेक्शनमध्ये Groww, ET Money यांसारखे थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्स लिंक असतात. हे प्लॅटफॉर्म Gpay अ‍ॅपच्या माध्यमातून UPI वापरून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. या गुंतवणुकीसाठी तुमचं PAN कार्ड, आधार आधारित KYC पूर्ण असणं आवश्यक असतं. यानंतर तुम्ही कोणत्याही AMC चा फंड निवडून SIP किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. Gpay वापरून म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक फायदा म्हणजे वापरण्यास अतिशय सोपं आणि सुरक्षित वातावरण. मात्र, लक्षात घ्या की ही गुंतवणूक प्रत्यक्ष Gpay च्या माध्यमातून होत नाही, तर Gpay केवळ इंटरफेस पुरवतो, गुंतवणुकीची प्रक्रिया Groww किंवा ET Money सारख्या प्लॅटफॉर्मवर पार पडते. त्यामुळे गुंतवणूक करताना कोणत्या थर्ड पार्टी अ‍ॅपशी लिंक आहे, ते जरूर तपासा.

म्युच्युअल फंडमध्ये पैसे दुप्पट होऊ शकतात का ?

हा एक महत्त्वाचा आणि गुंतवणूकदारांच्या मनात वारंवार येणारा प्रश्न आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्तर होय आहे – पैसे दुप्पट होऊ शकतात. मात्र, त्यासाठी कालावधी, फंडाचा परतावा आणि जोखीम हे घटक खूप महत्त्वाचे ठरतात.उदाहरणार्थ, जर तुम्ही 12% परतावा देणाऱ्या फंडात पैसे गुंतवले, तर 72/12 = 6 वर्षात तुमची गुंतवणूक दुप्पट होऊ शकते. मात्र, शेअर बाजाराशी निगडित असल्यामुळे म्युच्युअल फंड्सचा परतावा हमखास निश्चित नाही. काही वेळा फंड खराब कामगिरी करू शकतो किंवा बाजारात मोठी घसरण येऊ शकते. म्हणूनच, तुम्ही SIP सारख्या शिस्तबद्ध मार्गाने दीर्घकालीन गुंतवणुकीस प्राधान्य दिल्यास, पैसे दुप्पट होण्याची शक्यता वाढते. Equity mutual funds दीर्घकालात 12-15% पर्यंत परतावा देऊ शकतात, ज्यामुळे पैसे दुप्पट होण्याची शक्यता वास्तवात उतरते.

झेरोधा म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का ?

याचं उत्तर आहे – होय, अत्यंत सुरक्षित आहे. Zerodha ही भारतातील अग्रगण्य ब्रोकरेज फर्म असून, ती SEBI (Securities and Exchange Board of India) आणि BSE/NSE या अधिकृत संस्थांकडे रजिस्टर्ड आहे. Zerodha Coin हे त्यांचं म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी खास अ‍ॅप आहे, ज्यामध्ये तुम्ही Direct Mutual Funds मध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजेच तुम्हाला ब्रोकर कमिशन द्यावी लागत नाही. Coin अ‍ॅपमध्ये जेवढी गुंतवणूक तुम्ही करता, ती थेट फंड हाऊसच्या खात्यात जाते, Zerodha च्या खात्यात नाही. त्यामुळे तुमचे पैसे एक सुरक्षित पद्धतीने योग्य ठिकाणी पोहोचतात. शिवाय, Zerodha मध्ये KYC प्रक्रिया, OTP बेस्ड लॉगिन, SSL encryption यांसारखी अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत. अनेक वित्तीय तज्ज्ञही Zerodha चं प्लॅटफॉर्म सुरक्षित मानतात. मात्र, काही वापरकर्त्यांना Zerodha चा इंटरफेस थोडा क्लिष्ट वाटू शकतो, विशेषतः जे नव्याने गुंतवणूक करायला सुरुवात करत आहेत. पण, एकंदरित पाहता, Zerodha हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय आहे.

ग्रोव आरबीआय मंजूर आहे का?

या प्रश्नाचं उत्तर थोडं समजून घ्यायला हवं. Groww हे एक फिनटेक कंपनी आहे जे म्युच्युअल फंड, शेअर्स, गोल्ड, FDs यामध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देते. पण, ही एक बँक नाही. म्हणूनच Groww ला RBI ची थेट मंजुरी लागतेच असं नाही. Groww ही SEBI कडून रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर आहे आणि AMFI (Association of Mutual Funds in India) चा अधिकृत सदस्य सुद्धा आहे. म्हणून Groww फक्त गुंतवणुकीसाठी वापरला जातो, त्याद्वारे कोणतीही कर्ज सेवा, क्रेडिट कार्ड्स किंवा बँकिंग व्यवहार होत नाहीत. म्हणूनच RBI ची मंजुरी घेण्याची गरज त्यांना भासत नाही. अर्थात, जर Groww भविष्यात NBFC किंवा बँकिंग क्षेत्रात उतरलं, तर त्यांना RBI ची मंजुरी घ्यावी लागेल. आजच्या घडीला Groww ची व्यवस्था SEBI आणि AMFI च्या नियमानुसार पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केलेली प्रत्येक गुंतवणूक थेट संबंधित AMC कडे जाते, त्यामुळे तुमचे पैसे Groww च्या ताब्यात राहत नाहीत. SSL सिक्युरिटी, OTP लॉगिन, नियमित ऑडिट्स आणि ग्राहक सेवेची पारदर्शकता यामुळे Groww हे एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म मानलं जातं.

एकंदरीत पाहता, आजच्या तंत्रज्ञानयुगात गुंतवणूकदारांसाठी अनेक पर्याय खुले आहेत. गुगल फायनान्स हे स्टार्टिंग पॉइंट म्हणून माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे, पण ट्रॅकिंगसाठी Groww किंवा Zerodha सारखी अ‍ॅप्स अधिक योग्य आहेत. Gpay हा एक सहज आणि जलद पर्याय आहे, पण थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या माध्यमातूनच व्यवहार होतो. म्युच्युअल फंडद्वारे पैसे दुप्पट होऊ शकतात, पण त्यासाठी संयम, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टी आवश्यक आहे. Zerodha आणि Groww ही दोन्ही प्लॅटफॉर्म्स सुरक्षित आहेत, फक्त त्यांच्या काम करण्याच्या प्रणाली आणि नियंत्रण संस्था वेगवेगळ्या आहेत. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत आहात, त्याबाबत योग्य माहिती आणि नियोजन करूनच पुढे जा, कारण शेवटी “सुरक्षित गुंतवणूक” हाच यशस्वी आर्थिक प्रवासाचा पाया असतो.

आणखी वाचा

Disclaimer

ही माहिती केवळ शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. वरील लेखामध्ये दिलेली माहिती कोणत्याही प्रकारची आर्थिक सल्ला (Financial Advice) किंवा गुंतवणूक सल्ला (Investment Advice) म्हणून घेऊ नये. गुंतवणूक करताना नेहमी आपला स्वतःचा अभ्यास करावा किंवा प्रमाणित वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा. बाजारामध्ये गुंतवणूक करताना जोखीम असते, आणि यासाठी लेखक किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *