PPF अकाउंट म्हणजे काय? फायदे, व्याजदर, टॅक्स सवलत आणि संपूर्ण माहिती (2025)

PPF अकाउंट विषयी माहिती देणारा मराठी ग्राफिक

PPF अकाउंट म्हणजे काय ? (PPF Account)


PPF म्हणजे Public provident fund. हे एक इन्व्हेस्टमेंट अकाऊंट आहे. अधिकतर बँक्स तुम्हाला PPF ची सुविधा देतात. तसेच हे एक long term इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे जी स्वतः भारतीय सरकारने सामान्य लोकांसाठी चालू केली आहे.

PPF अकाउंट कसे काम करते ?


जसे की मी सांगितले की भारतीय सरकार ची योजना आहे आणि ही एक चांगली आणि सुरक्षित योजना आहे. ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला टॅक्स मध्ये पण बेनिफिट भेटेल. म्हणजेच टॅक्स फाइल रिटर्न करताना तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंट ची डिटेल्स भरलीत तुमचा खूप काही प्रमाणात टॅक्स कमी होऊ शकतो. हा बेनिफिट जेव्हा पण घ्यायचा असेल तेव्हा तुम्ही टॅक्स फाइल भरताना इन्कम टॅक्स ऍक्ट ८०C मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट दाखवू शकता.

PPF कसे काम करते


जाणून घेऊ की PPF कसे काम करते.


१. इन्व्हेस्टमेंट ( Investment )


PPF मध्ये आपण कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये वर्षाला जमा करू शकतो. लक्षात ठेवा ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फायनान्सियल वर्षात करायची आहे.

२. परिपक्वता ( PPF Maturity )


आता प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मध्ये काही Maturity असते, म्हणजेच की आपण कधी पैसे काढू शकतो किंवा आपल्याला कधी पैसे मिळतील हा प्रश्न सर्वात प्रथम आपल्या मनात येतो. खूप काही इन्व्हेस्टमेंट आहेत ज्यांची मॅच्युरिटी कधी लवकर तर कधी काही वर्षानंतर असते. जसे की PPF ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तुम्ही जे काही पैसे वर्षाला भराल ते तुम्ही १५ वर्षानंतर तुम्ही काढू शकता.

३. पैसे काढणे ( PPF Withdrawal Rule)


आता कसे असते की जो पर्यंत आपल्याकडे पैसे आहेत तो पर्यंत आपण कधी इन्व्हेस्टमेंट ला हात लावत नाही. पण जर का तुम्हाला पैशाची गरज पडली तर ही योजना तुम्हाला ५०% पर्यंत ची इन्व्हेस्ट केलेली रक्कम काढण्यास मदत करते पण ते ही ७ वर्षानंतर. म्हणजेच ७ वर्षामध्ये तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केली आहे PPF Account त्यामधून तुम्ही ५०% काढू शकता.

४. टॅक्स बेनिफिट ( PPF Tax benefits)


PPF : जसे की मी सांगितले ह्या इन्व्हेस्टमेंट वर तुम्ही income tax act ८०C मध्ये टॅक्स बेनिफिट घेऊ शकता.
तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट कराल त्यावर जो काही इंटरेस्ट म्हणजेच व्याज भेटेल ते सुद्धा टॅक्स फ्री आहे.
सर्वात महत्त्वाचे की PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर जेव्हा पण तुमची मॅच्युरिटी असेल तेव्हा तुम्हाला जे काही पैसे भेटतील ते सुद्धा टॅक्स फ्री आहे.

पीपीएफ किंवा एफडी कोणता चांगला आहे ?


PPF पीपीएफ किंवा एफडी ह्या दोन्ही पण इन्व्हेस्टमेंट सुविधा आहेत ज्या आपल्याला कोणत्या ही बँक मध्ये जाऊन तुम्ही चालू करू शकता. पण आता प्रश्न असा आहे की कुठे इन्व्हेस्ट करावे. तर ह्याचे साधे सरळ उत्तर तुमच्याच कडे आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की long term पैसे ठेवायचे आहे तर तुम्ही PPF करू शकता आणि जर का तुम्ही short term म्हणजेच १ किंवा २ वर्षासाठी इन्व्हेस्ट करू इच्छिता तर तुम्ही FD करू शकता.

किती व्याज देते PPF ? ( PPF Interest rate )


PPF : सर्वात महत्त्वाचे मुद्दा हा आहे की आपण जिथे पैसे इन्व्हेस्ट करतो तिथे आपल्याला रिटर्न म्हणजेच व्याज किती भेटेल. जर का खूपच कमी असेल तर कोणीच इन्व्हेस्ट करणार नाही. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ह्यांनी ७.१० % हे व्याज दर प्रत्येक वर्षाला अजून पर्यंत तरी दिले आहे. होऊ शकते की हे व्याजदर पुढील काही वर्षात कमी किंवा जास्त होऊ शकते.

PPF Interest rate Calculator


PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर किंवा करण्याअगोदर जर का तुम्हाला पाहायचे असेल की किती इन्व्हेस्टमेंट वर तुम्हाला किती फायदा होईल किंवा किती इन्व्हेस्टमेंट वर किती व्याज भेटेल तर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता.

PPF Calculator

PPF Account कसे बनवावे ?


PPF बद्दल सर्वे माहिती समजून घेतल्यावर तुम्हाला खरच PPF Account चालू करायचे असेल तर तुम्ही तुमचे बँकेचे खाते ज्या बँक मध्ये असेल तिथे जा आणि एक साधा फॉर्म भरून तुम्ही PPF account चालू करू शकता. हे अकाउंट तुमच्या बँकेच्या अकाऊंट शी जोडलेले असेल. किंवा तुम्ही घर बसल्या देखील ऑनलाईन करू शकता. तुम्ही तुमच्या बँकेच्या अँप वर login करा आणि PPF शोधा , तुमच्या काही डिटेल्स असतील त्या भरून सबमिट करा. तुम्ही लगेचच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता.

PPF अकाउंट ही एक सुरक्षित, फायदेशीर आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे जी प्रत्येकाने आपल्या आर्थिक नियोजनात समाविष्ट करणे आवश्यक आहे. कमी जोखीम, सरकारची हमी, आणि टॅक्स सवलतींसह मिळणारे व्याज हे PPF ला इतर योजनांपेक्षा वेगळं ठरवतं. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी शाश्वत आणि कर सवलतीसह गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर PPF हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आजच तुमच्या बँकेच्या अ‍ॅपमधून किंवा जवळच्या शाखेतून PPF अकाउंट उघडा आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करा.

PPF बंद करू शकतो का?

PPF अकाउंट बंद करायचा विचार करताय? थांबा! आधी हे समजून घ्या
PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी हे सरकारमान्य एक दीर्घकालीन बचत व गुंतवणूक साधन आहे. बर्‍याचदा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून ऐकायला मिळतं की “PPF कधीही बंद करता येतं का?” पण सत्य हे आहे की, PPF हे इतर बँक खात्यांप्रमाणे सहज बंद करता येत नाही. कारण यामागे सरकारचा उद्देश आहे तुम्ही दीर्घकाळासाठी बचत करावी, आणि रिटायरमेंटच्या वेळी ती रक्कम तुमच्यासाठी उपयोगी पडावी. PPF चा मूळ कालावधी 15 वर्षांचा आहे. त्यामुळे, काही अपवादात्मक परिस्थिती वगळता, आपण हे खाते मध्येच बंद करू शकत नाही. मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा PPF उघडलं, तेव्हा मला वाटलं की पैशांची गरज लागली की काढता येईल पण प्रत्यक्षात जेव्हा गरज पडली, तेव्हा कळालं की नियम खूपच काटेकोर आहेत.

जवळचं संकट असो, तरीही PPF मधून पैसे काढणं सोपं नाही
कधी कधी आयुष्यात अचानक आर्थिक अडचणी येतात हॉस्पिटलचे खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी, किंवा अचानक आलेली बेरोजगारी. अशा वेळी साठवलेले पैसे उपयोगी पडतील असं वाटतं. पण PPF अकाउंटसाठी काही ठराविक नियम आहेत. उदाहरणार्थ, जर तुमचं PPF अकाउंट 5 वर्षांहून जास्त जुने असेल, आणि तुम्हाला उपचार, शिक्षण किंवा मृत्यूसारखी गंभीर कारणं आहेत,

तरच तुम्ही मध्यवर्ती बंद (premature closure) करू शकता. पण त्यासाठीही मेडिकल डॉक्युमेंट्स, शैक्षणिक संस्थेचे सर्टिफिकेट्स वगैरे सादर करावे लागतात. मला आठवतं, एका मित्राला आईच्या उपचारासाठी पैसे लागले होते, पण PPF बंद करणं एवढं सोपं नव्हतं. बँकेचे फॉर्म, अधिकाऱ्यांची विचारपूस, कारणाची गंभीरता हे सगळं पार करावं लागलं. म्हणूनच PPF ही आपत्कालीन निधी नाही, तर एका शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेल्या गुंतवणुकीचा पर्याय आहे.

PPF मध्ये सातत्य ठेवा; गरज लागलीच तर योग्य मार्ग अवलंबा
PPF अकाउंट चालू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान ₹500 भरावं लागतं, हे आपण सगळे जाणतो. पण खरं म्हणजे PPF ही आपल्या भविष्याची हमी आहे आज आपण जी शिस्त लावतो, ती उद्याच्या सुरक्षिततेत बदलते. जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि PPF मधून काहीतरी हवं असेल, तर ‘loan against PPF’ किंवा ‘partial withdrawal’ हे पर्यायही असतात. PPF मधून 7व्या वर्षापासून काही रक्कम काढता येते, पण ती पूर्ण बंद करण्याइतकी सहज प्रक्रिया नसते.

मी स्वतः PPF मध्ये दरवर्षी थोडी थोडी गुंतवणूक करतो, आणि मनात असतं की ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याची बचत आहे. म्हणूनच सांगावंसं वाटतं – जर तुम्ही PPF अकाउंट कधीही बंद करायचा विचार करत असाल, तर दोनदा विचार करा. कारण ती केवळ एक बँक स्कीम नाही, ती एक आर्थिक सवय आहे, जी उद्याचं आयुष्य बदलू शकते.

तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर तो इतरांसोबत शेअर करायला विसरू नका!

आणखी वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *