Sonyacha Aajcha Bhav : सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव आणि हॉलमार्क तपासण्याची योग्य पद्धत! 2025

Sonyacha Aajcha Bhav: आपल्या महाराष्ट्रामध्ये सोन्याला फार काही किंमत आहे इतकी किंमत आहे की पूर्वीचे लोक सुद्धा अजूनही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सोन्याच्या किमतीने प्रत्येक देशाची जीडीपी ठरवली जाते पण सोना इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर काही राज्यांमध्ये सोन इन्व्हस्टमेंट म्हणून लोक त्याच्याकडे बघतात.


खूप सारे लोक सोनं खरेदी करताना कधी त्याचा भाव किंवा काय हे नक्कीच बघतात पण ज्या वेळेला जो भाव चालू असेल त्या वळेला ते त्याच भावाच्या हिशोबाने खरेदी करतात पण हा जो भाव आहे तो बरोबर आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्याकडे काहीही उपाय नाही आहे. मग आपण कसे ठरवाल की ज्या वेळेला मी सोना घेतो आहे त्या वळेला सोन्याचा भाव हा जास्त आहे की कमी आहे. तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे की सोन्याचा भाव कसा तपासावा आणि सोना घेताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.


Sonyacha Aajcha Bhav kasa aaplyala samjhel ?

  • Sonyacha Aajcha Bhav: जसे की तुम्हाला माहिती असेल सोना इन्व्हेस्टमेंट म्हणून एक चांगला पर्याय आहे पण सोनं घेताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि त्याचा भाव काय चालला आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो.
  • सोना हे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेटमध्ये येतो जसं की 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट पण या सगळ्या गोष्टींची या सगळ्या सोन्याच्या भावाची किंमत तुम्ही तुमच्या फोनवरतीच मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्याच मोबाईल नंबर वरून ८९५५६६४४३३ या क्रमांकावर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस प्राप्त होईल त्या एसएमएस मध्ये तुम्हाला सोन्याचा आजचा ताजा भाव समजण्यात येईल.
  • Sonyacha Aajcha Bhav: गोल्ड चे प्राईस चार्ट म्हणजेच गोल्ड हे एक कमोडिटी मार्केटमध्ये इन बोल्ट आहे म्हणजे गोल्ड हे शेअर बाजारामध्ये सुद्धा अग्रेसर आहे मग गोल्ड चे भाव समजण्यासाठी तुम्ही गुगल वरती जाऊन गोल्ड प्राइस चार्ट हे सर्च केले तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये गोल ची काय प्राईस चालू आहे हे देखील तुम्हाला समजू शकते.
  • हे तर झालं मोबाईल ने तुम्ही भाव तपासत आहात पण जर का तुम्हाला कोणत्याही वेबसाईट थ्रू माहिती मिळवायची असेल तर ibja.co ह्या वेबसाईटवर तुम्हाला 18, 24, 22 कॅरेट च्य सोन्याचे ताजा भाव तुम्हाला समजतील आता तुम्हाला कोणत्याही ठिकाणी भटकायची गरज लागणार नाही मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्यानुसार जर का तुम्ही केले तर तुम्हाला घर बसल्या सोन्याचे आत्ता चाललेले भाव तुम्हाला समज तील.

Gold Rate Today


सोना खरेदी करताना कोणत्या गोष्टींचं ध्यान ठेवावे ?

  • Sonyacha Aajcha Bhav: सोने खरेदी करताना तुम्ही ज्या काही भावामध्ये सोनं उचलले आहे ते किती ग्राम्स आहेत किंवा त्याचं वजन काय आहे त्या वजनाच्या हिशोबाने आपण पैसे देतो आहे की नाही याची काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे.
  • महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की आपण कोणत्या सर्टिफिकेशन ने ते सोनं घेत आहे जसं की भारतामध्ये आता आयएसआय सर्टिफिकेशन चालू आहे ९१६ हॉलमार्क सर्टिफिकेट आहे आपण खूप सार्‍या ठिकाणावरून सोनं घेतो पण आपण कधी चेक नाही करत की आपला सोना हे हॉलमार्क सर्टिफिकेशन आहे की नाही. भारतीय गव्हर्मेंट ने सोन्याची एक सर्टिफिकेशन किंवा पात्रता जारी केला आहे त्याला हॉलमार्क म्हणतात त्यामुळे जेव्हाही तुम्ही सोनं खरेदी कराल तेव्हा ९१६ हॉलमार्क आहे की नाही याची तपासणी करणं गरजेचं आहे.
  • भारतीय कायद्यानुसार तुम्हाला जेव्हाही तुम्ही सोनं खरेदी कराल तेव्हा त्या सोन्यावरती तुम्हाला ३% GST हे भरावा लागतं त्यामुळे जेव्हाही तुम्ही घरबसल्या सोनं मागवाल किंवा दुकानांमधून सोना घ्यायला जाल तेव्हा दुकानदाराला तुम्ही ३% GST इनव्हॉईस किंवा बिल मागा.
  • Sonyacha Aajcha Bhav: आता राहिली गोष्ट 24 कॅरेट ची तुम्हाला असं वाटत असेल की 24 कॅरेट हे एकदम प्युअर गोल्ड आहे पण तसे नसते प्युअर गोल्ड हे कधीच प्युअर नसते त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी धातूचं समीकरण हे बसवलेलं असतं त्यामुळे तुम्हाला कधीच कोणत्याही परिस्थितीत प्युअर बोल् हे मिळू शकत नाही. मग अशा वेळेला काय करावं हा प्रश्न निर्माण होतो तर सरळ आहे की तुम्ही 24 कॅरेट यासाठी खरेदी करा त्यामध्ये गोलची प्युरिटी ही खूप जास्त असते आणि बाकींच्या धातूंचं समीकरण हे फार कमी असतं. जसे की तुम्ही 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायला जाताल तर तुम्हाला 24 कॅरेट पेक्षा त्याच्यामध्ये सोनं कमी मिळेल आणि बाकीच्या धातू तुमची समीकरणे जास्त भेटतील.

हॉलमार्क सर्टिफिकेशन काय आहे?


Sonyacha Aajcha Bhav: हॉलमार्क ही एक मोठी प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला समजते की गोल्ड हे किती प्युअर आहे आणि हे भारतीय गव्हर्मेंट ने तन फक्त ग्राहकांच्या सोयीसाठी बनवले आहे जेणेकरून ग्राहक याचा वापर करून समजू शकतील की गोल्ड हे किती प्युअर आहे.
इंडिया मध्ये बी आय एस हा हॉलमार्क चालतो बी आय एस म्हणजेच Bureau of Indian Standards. भारतामध्ये हा हॉलमार्क ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये तुम्हाला सोन्यावरती बघायला मिळेल जर जर का हे बघायला मिळाले तर समजून जा की ते सोनं खूप प्युअर आहे त्याच्यामध्ये इतर धातूंची समीकरण फार कमी आहे.

जेव्हाही सोनं खरेदी करायला जाताल तेव्हा मी दिलेल्या चार-पाच गोष्टींवरती तुम्ही नेहमी नक्कीच विचार करा आणि जेव्हाही सुनो खरेदी कराल तेव्हा ह्या चार गोष्टी तुमच्या हातात आहे की नाही यचा विचार करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गुगल पे मध्ये गोल्ड स्कीम काय आहे?

आजकाल डिजिटल पेमेंटच्या जमान्यात, गुगल पेसारखे अ‍ॅप्स केवळ पैसे पाठवण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही वापरले जात आहेत. गुगल पेची ‘गोल्ड स्कीम’ ही त्यापैकीच एक आहे. ही स्कीम वापरकर्त्यांना त्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून २४ कॅरेट सोनं खरेदी करण्याची संधी देते. यामध्ये वापरकर्ते अगदी १ रुपयापासून सोनं खरेदी करू शकतात आणि आपल्या डिजिटल लॉकरमध्ये ते सुरक्षित ठेवू शकतात. सोन्याची खरेदी MMTC-PAMP या सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून केली जाते, त्यामुळे विश्वासार्हतेचा भागही निश्चित होतो.

हे सोनं तुम्ही कधीही विकू शकता, पैसे लगेच बँक खात्यात येतात. किंवा तुम्हाला हवं असल्यास ते फिजिकल स्वरूपातही घरी मागवता येतं. अनेक जण आज गुगल पेच्या माध्यमातून छोट्या प्रमाणात रोज सोनं खरेदी करत आहेत, जेणेकरून भविष्यात मोठा निधी तयार करता येईल. या स्कीमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही मेंटेनन्स फी नाही, आणि सुरक्षा देखील उत्तम प्रकारे राखली जाते.

भारतात सोन्याच्या दराची सूचना कशी मिळवायची?

आपण नेहमी सोनं खरेदी करताना विचार करतो की आजचा दर काय आहे? आणि हा दर वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी गुगल, गुगल पे, तसेच इतर फायनान्शियल अ‍ॅप्समध्ये रिअल टाईम अपडेट मिळवण्यासाठी सुविधा दिल्या जातात. गुगल सर्चवर “आजचा सोन्याचा दर” असं टाकलं तरी तुम्हाला स्थानिक शहरातील किंमत दिसून येते. याशिवाय गुगल पे अ‍ॅपमध्ये सोनं खरेदी करताना, त्याचा सध्याचा दरही दाखवला जातो.

अनेक लोक आज WhatsApp किंवा Telegram चॅनल्सच्या माध्यमातून सोन्याच्या किमतींचे डेली अलर्ट घेतात. यातून दर दिवसाच्या दरांमध्ये होणाऱ्या चढ-उतारांवर लक्ष ठेवणं शक्य होतं आणि योग्य वेळी खरेदीचा निर्णय घेता येतो.

सोने योजना कशी काम करते?

सोने योजना म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक योजना आहे, जी तुम्हाला थोड्या-थोड्या पैशात सोनं खरेदी करण्याची संधी देते. गुगल पे सारखी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही योजना अत्यंत सोप्या भाषेत समजावली जाते. यात तुम्ही अगदी १, ५, १० रुपयांपासून रोज किंवा आठवड्याला सोनं खरेदी करू शकता. हे सोनं डिजिटल स्वरूपात तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतं. यामध्ये वापरकर्त्याचा हक्क असतो शुद्ध २४ कॅरेट सोन्यावर, जो MMTC-PAMP कडून प्रमाणित केला जातो.

गोल्ड योजना मुख्यतः लवचिकतेवर आधारित असते. कधीही विक्री करता येते, खरेदी करता येते, आणि सोने फिजिकल स्वरूपात मागवण्याचीही मुभा असते. काही बँका आणि कंपन्या ‘गोल्ड सेव्हिंग प्लान’ देखील देतात, जिथे एक ठराविक कालावधीपर्यंत पैसे भरल्यानंतर, तुम्हाला हवं तेवढं शुद्ध सोनं मिळतं. ही योजना गुंतवणूक म्हणून सुरक्षित आहे, कारण सोन्याची किंमत काळानुसार वाढण्याची शक्यता असते.

सोन्याच्या किमतीचे अलर्ट कसे मिळवायचे?

सोन्याच्या किमतीमध्ये होणारे बदल हे अनेक कारणांवर अवलंबून असतात – आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, डॉलरचा भाव, मागणी-पुरवठा यासारख्या गोष्टी. यामुळे सोनं खरेदी करण्याचा योग्य वेळ कधी हे जाणून घेण्यासाठी ‘गोल्ड प्राईस अलर्ट्स’ मिळवणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही गुगल अलर्ट्स सेट करू शकता, जिथे ‘Gold Price Today in India’ असं टाकल्यावर मेलद्वारे दररोज माहिती मिळते.

तसेच, गुगल पे, PhonePe, Paytm, Zerodha Gold, किंवा Upstox सारख्या अ‍ॅप्समध्येही तुम्ही गोल्ड अलर्ट सेट करू शकता. काही अ‍ॅप्समध्ये ‘Price Alert’ फीचर असतं – जसं की तुम्ही एक विशिष्ट किंमत सेट केली की त्या किंमतीला पोहोचल्यावर तुम्हाला सूचना येते. हे फीचर विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे योग्य वेळेची वाट बघत आहेत.

सोन्यामध्ये VA म्हणजे काय?

सोनं खरेदी करताना आपल्या बिलामध्ये आपण एक गोष्ट पाहतो – VA म्हणजेच ‘वॅल्यू अ‍ॅडिशन चार्जेस’. ही अशी रक्कम असते जी दागिन्यांच्या डिझाइन, बनवणूक, कारागिरी आणि प्रोसेसिंगसाठी घेतली जाते. उदाहरणार्थ, एखादा साधा अंगठी असेल तर त्याचं VA कमी असेल, पण जर त्यात नक्षीकाम, दगड किंवा विशेष डिझाईन असेल, तर VA जास्त असेल.

हे चार्जेस दागिन्याच्या वास्तविक सोन्याच्या वजनाच्या किंमतीशिवाय अतिरिक्त असतात. म्हणजेच सोन्याचा दर X वजन = बेस किंमत आणि त्यावर VA म्हणजे अंतिम किंमत. त्यामुळे दागिने खरेदी करताना VA किती घेतला जातो याची माहिती घेणं खूप महत्त्वाचं असतं.अनेक ग्राहक याबद्दल अनभिज्ञ असतात, त्यामुळे याबाबत जागरूक होणं आवश्यक आहे.

आरबीआयची सुवर्ण योजना काय आहे?

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी ‘सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड स्कीम’ (Sovereign Gold Bond Scheme) सुरू केली जाते. ही योजना खास त्यांच्यासाठी आहे जे सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात पण फिजिकल सोनं ठेवण्याची जोखीम नको आहे. यात तुम्ही १ ग्रॅमपासून ते ४ किलोपर्यंत सोनं बाँड स्वरूपात खरेदी करू शकता. या बाँड्सना सरकारची मान्यता असते, त्यामुळे ही एक सुरक्षित गुंतवणूक ठरते.

या योजनेंतर्गत तुम्हाला सोन्याच्या दरावरील परतावा तर मिळतोच, त्यासोबत दरवर्षी २.५% निश्चित व्याज देखील मिळतं. यामध्ये कागदी स्वरूपात गुंतवणूक होते, त्यामुळे चोरीचा धोका राहत नाही, आणि विक्री करणे सोपे होते. काही वेळेस हे बाँड स्टॉक एक्सचेंजवरही ट्रेड केले जातात. यामुळे लिक्विडिटी देखील उत्तम असते.

असे बाँड्स सहा ते आठ वर्षांपर्यंतचे असतात, आणि परिपक्वतेनंतर सरकारद्वारे बाजारभावावर पैसे मिळतात. गुंतवणूकदारांसाठी ही योजना दीर्घकालीन फायद्याची आहे आणि कर सवलतीचाही लाभ मिळू शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर RBI ची ही सुवर्ण योजना खूपच आकर्षक पर्याय आहे.

आम्हाला नक्की सांगा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तेही जरूर कळवा! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत.

आणखी वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *