
Table of Contents
Aadhar (आधार ) अपडेट:
तुम्हाला माहितीच असेल की आधार कार्ड च्या डिटेल्स अपडेट करण्यासाठी खूप त्रास होतो. पण आता जर का तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या काही पण किंवा महत्वाच्या डिटेल्स अपडेट करायचे असेल तर ही योग्य वेळ आहे. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ह्यांनी नागरिकांसाठी १४ जून २०२५ पर्यंतचा वेळ दिला आहे. ह्या तारखेपर्यंत आता नागरिकांना Aadhar (आधार ) कार्ड मध्ये काही पण डिटेल्स अपडेट करायची असेल तर ते विनाशुल्क करू शकता.
ही सुविधा मागील वर्षीच चालू झाली होती पण काही कारणास्तव ती रद्द केली गेली. मागील वर्षापर्यंत, पहिले तुम्ही काही पण अपडेट करायचे असेल तर तुम्हाला स्वतः Aadhar (आधार ) केंद्र वर जाऊन तुम्हाला ५० रुपये देऊन तुम्ही काही पण डिटेल्स अपडेट करू शकत होते.
पण आता तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहे आधार कार्ड मधील तुमचे काही पण डिटेल्स विनाशुल्क अपडेट करण्यासाठी. माझी आपणास विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या सुविधांचा फायदा घ्या आणि आपले महत्वाचे डिटेल्स विनाशुल्क अपडेट करा.
ह्या लेखा मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की का तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. कोणते असे बदल करणे गरजेचे आहे आणि जे ऑनलाईन तुम्ही करू शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कोणतीही प्रोसेस विसरणार नाहीत. लक्षात ठेवा की ही एक शेवटची संधी आहे विनाशुल्क आधार अपडेट करण्यासाठी.
Aadhar (आधार ) कार्ड अपडेट करणे का गरजेचे आहे ?
UIDAI च्या 2016 मधील आधार नोंदणी आणि अपडेट नियमांनुसार, प्रत्येक नागरिकाने आपल्या आधार कार्डातील ओळख व पत्त्याची माहिती म्हणजेच आयडेंटिटी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ दर १० वर्षांनी एकदा तरी अपडेट करणे आवश्यक आहे. हे बदल केल्यामुळे ह्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तुमच्या डिटेल्स अपडेट केल्यामुळे तुम्हाला पुढील येणाऱ्या परस्थिती टाळू शकता जसे की सरकारी योजना मध्ये, बँकेचे खाते चालू करण्यासाठी किंवा कोणतेही KYC प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला Aadhar (आधार ) मधील डिटेल्स अपडेट करणे गरजेचे आहे.
कारण आता सर्व ठिकाणी तुमचा Aadhar (आधार ) कार्ड चा नंबर अपडेट आहे. त्यामुळे तुम्ही जर का ही डिटेल अपडेट केली की सहाजिकच सर्वे ठिकाणी ती अपडेट होईल. पण अपडेट न करता तुम्ही कोणत्या ही ठिकाणी अर्ज करत असाल तर तो लगेच बाद होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी सुद्धा तुम्हाला हेच सांगतील की कोणताही अर्ज दाखल करण्याअगोदर सर्वात प्रथम तुम्ही तुमचे Aadhar (आधार ) अपडेट करून या. त्यामुळे Aadhar (आधार ) कार्ड च्या डिटेल्स अपडेट करणे सर्वांसाठीच खूप खूप महत्त्वाचे आहे.
Aadhar (आधार ) वरील कोणत्या माहिती ऑनलाइन अपडेट करू शकता.
जसे की वरील लेखा वरून तुम्हाला समजलेच असेल की सध्यातरी ही विनाशुल्क सुविधा आहे. पण महत्वाचे म्हणजे काही मोजक्याच डेमोग्राफिक डिटेल्स ह्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही खालील दिलेल्या माहिती ऑनलाइन जाऊन त्यामध्ये फेरबदल करू शकता.
- नाव
- जन्म तारीख
- पत्ता
- लिंग
- तुमची भाषा
इतकी माहिती ही ऑनलाईन जाऊन तुम्ही बदल करू शकता पण बाकीची माहिती jasi ki फिंगरप्रिंट, तुमचा फोटो, एरिस स्कॅन हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या Aadhar (आधार ) केंद्र वर जाऊनच करावे लागेल. ह्या गोष्टीसाठी मात्र पैसे घेतले जातील.
Aadhar (आधार ) अपडेट
ऑनलाईन तुम्हाला तुमचे Aadhar (आधार ) कार्ड ची काही डिटेल अपडेट करायची असेल तर ती एकदम सोपी पद्धत आहे. तर जाऊन घेऊ की कसे ऑनलाईन जाऊन सहजरित्या तुम्ही ह्या डिटेल अपडेट करू शकता.
- सर्वात प्रथम तुम्ही खाली दिलेल्या संकेतस्थळावर जा.
- https://myaadhaar.uidai.gov.in (My Aadhaar Portal).
- त्यानंतर तुमचे आधार नंबर टाका आणि तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो तुम्ही तिथे टाका आणि लॉगिन ची प्रकिया पूर्ण करा. लक्षात ठेवा की जो मोबाईल तुमच्या आधार कार्ड la जोडलेला आहे त्यावरच हा OTP येईल.
- एकदा तुम्ही लॉगिन झाले की वरच्या उजव्या बाजूस तिथे एक पर्याय असेल ‘Document Update’ म्हणून त्या वर क्लिक करा.
- तुमचे योग्य ते प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस चे डॉक्युमेंट अपलोड करा. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अपलोड करत असलेले डॉक्युमेंट 2 MB च्या आत असणे आवश्यक आहे आणि ते फक्त JPEG, PNG किंवा PDF या फॉरमॅटपैकीच एका फॉरमॅटमध्ये असावं. कागदपत्र स्पष्ट, वाचनीय आणि योग्य प्रकारे स्कॅन केलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे. जर कागदपत्र धुसर, चुकीचं किंवा नियमांच्या विरुद्ध असेल, तर ते स्वीकारलं जाणार नाही आणि त्याऐवजी स्क्रीनवर एरर मेसेज किंवा सूचना दिसू शकते. पण घाबरून जाऊन नका. वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पुन्हा तयार करा आणि परत जाऊन अपलोड करा. नक्कीच ते अपलोड होतील. एकदा डॉक्युमेंट अपलोड झाले की पुन्हा एकदा सर्वे काही बरोबर केले आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या. अपलोड केल्यानंतर तिथे एक सबमिट चे बटन असेल त्या वर क्लिक करा.
- तुमचं सबमिशन यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला एक सर्विस रिक्वेस्ट नंबर (SRN) दिला जाईल, जो भविष्यातील अपडेट्ससाठी उपयुक्त ठरेल. ह्या नंबर चा वापर करून तुम्ही पाहू शकता की तुमचे Aadhar (आधार ) कार्ड कधी पर्यंत किंवा त्याचे स्टेटस काय आहे. हा नंबर तुम्ही जवळच्या
- तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमच्या अपडेटची स्थिती सहजपणे जाणून घेऊ शकता. यामुळे तुम्ही केलेले बदल पूर्ण झालेत की नाही, आणि अपडेट झालेलं आधार कार्ड तुम्हाला नेमकं कधीपर्यंत मिळेल, याची स्पष्ट कल्पना येईल.
ही प्रकिया काही मिनिटांची आहे पण जर का तुम्ही अगोदरच तुमचे डॉक्युमेन तयार ठेवले तरच.
आधार अपडेटला कोण मान्यता देते?
१. “आधार बदलतो पण मान्यता कोण देतं?” एक घरगुती प्रश्न
आधारकार्ड आजच्या काळात इतकं महत्त्वाचं झालंय की त्यात काही चूक झाली की अगदी बँकेपासून ते रेशनकार्ड, शाळा ते पासपोर्ट पर्यंत सगळीकडे अडचण येते. आपल्यातल्या अनेकांना अनुभव असतो, एखादं पत्र चुकीचं आलं, मोबाइल नंबर बदलला किंवा नावात टायपो झालं मग वाटतं की “हे सगळं बदलायचं असेल तर कुणाकडे जावं?” आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बदल कोण मान्य करतं?
खरंतर आधारचं व्यवस्थापन UIDAI (Unique Identification Authority of India) नावाचं एक सरकारी संस्थान करतं. याचं मुख्य काम म्हणजे देशभरात आधार कार्ड तयार करणं, अपडेट करणं आणि सुरक्षित ठेवणं. आपण आधार अपडेट करतो तेव्हा तो फक्त एका मशीनमधून होत नाही तर त्यामागे एक पूर्ण साखळी असते. उदाहरणार्थ, तुम्ही जर आधार केंद्रावर जाऊन फोटो किंवा पत्ता बदलायला गेलात, तर आधी तिथला Operator तुमची माहिती घेतो, नंतर एक Supervisor ती माहिती तपासतो, आणि शेवटी UIDAI त्या बदलाला डिजिटल मान्यता देतो. म्हणजे प्रत्येक अपडेटच्या मागे ३ ते ४ पातळ्यांवरची खात्रीशीर प्रक्रिया असते.
२. “ऑनलाइन किंवा केंद्रावरून अपडेट पण खात्री कोण करतो?”
आजकाल सगळंच डिजिटल झालं असलं तरी अनेक लोक आजही आधार अपडेटसाठी केंद्रांवर जातात कारण तिथे प्रत्यक्ष माणूस भेटतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर पत्ता बदलायला गेलात तर आधार केंद्रावर बसलेला Enrolment Operator तुमची नवी माहिती सिस्टममध्ये टाकतो, मग Supervisor त्याची खातरजमा करतो, आणि मग UIDAI त्याला अंतिम मान्यता देतो. ही प्रोसेस अगदी बँकेच्या कॅशियरपासून मॅनेजरकडे जाणाऱ्या नोटेसारखी आहे प्रत्येक टप्प्यावर खात्री केली जाते. जर काही कागदपत्र अपूर्ण असतील, किंवा आधारचा फॉर्म चुकीचा भरलेला असेल, तर ते लगेच कळवलं जातं कारण फक्त सही करून देणं UIDAIचं काम नाही, तर माहिती शंभर टक्के बरोबर आहे याची जबाबदारी त्यांची असते.
तुम्ही जर ऑनलाइन मोबाइल नंबर किंवा पत्ता अपडेट करत असाल तर, ती प्रक्रिया थोडी वेगळी असते. SSUP Portal (Self Service Update Portal) वरून तुम्ही पत्ता अपडेट केला, तर एक डिजिटल व्हेरिफिकेशन होतं कधी कधी घरच्या नातेवाइकाला ‘लिंक’ पाठवून व्हेरिफाय करावं लागतं, तर कधी कागदपत्र अपलोड करावी लागतात. पण शेवटी यालाही मान्यता UIDAI देतंच. यात कोणताही खाजगी माणूस मधे नसतो, आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक असते. बरेचदा लोक घाबरून जातात की “ही माहिती कुठे तरी लीक होईल का?”, पण UIDAI चा संपूर्ण सिस्टम ISO-certified असून डेटा एन्क्रिप्टेड पद्धतीने साठवला जातो.
३. “तुम्ही + तुमचा विश्वासू व्हेरिफायर + UIDAI = खात्रीशीर अपडेट”
सर्वात सुंदर भाग म्हणजे, ही सगळी प्रक्रिया आता घरबसल्या शक्य आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे योग्य कागदपत्रं असतील, आणि तुम्ही आधार अपडेट करण्याची ईच्छा व्यक्त केली, तर तुमच्या बदलाला मान्यता देण्यासाठी कुणीतरी जवळचं व्यक्ती (उदा. पती, आई, भाऊ) “व्हेरिफायर” म्हणून त्या अपडेटला संमती देतो. म्हणजेच आधार सिस्टिम म्हणते, “या बदलाला या व्यक्तीनेही अनुमती दिली आहे, मग हे अधिकृत धरलं जाऊ शकतं.” आणि ह्या सगळ्या प्रक्रियेवर शेवटी UIDAI अंतिम शिक्कामोर्तब करतं.
कधी तरी आपण म्हणतो, “एवढ्या गोष्टीसाठी आधार बदलणं म्हणजे डोकेदुखीच वाटते!” पण खरंतर, ही एक सुरक्षा प्रक्रिया आहे. सरकारला माहिती हवी आहे की, हा बदल खरा आहे का? कोणत्याही गैरवापरापासून वाचवण्यासाठी हाच तो ‘व्हेरिफायर’ + ‘UIDAI’ यांचा युतीचा मजबूत आधार आहे. आणि हो, एक चांगली गोष्ट UIDAI सध्या 14 जून 2025 पर्यंत आधार अपडेट मोफत करत आहे. म्हणजे जर पत्ता, फोटो, नाव यापैकी काही बदलायचं असेल तर एक रुपयाही न देता ऑनलाइन किंवा केंद्रावरून बदलता येतं.
कोणते डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे अपलोड करायचे आहे ?
जसे की मी तुम्हाला सांगितले काही महत्वाचे व डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे UIDAI ने अपलोड करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी (PoI) आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस (PoA). खाली दिलेल्या लिस्ट पैकी तुम्ही कोणते ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
महत्त्वाचे म्हणजे खाली दिलेले कागदपत्रे ही खूप ठिकाणी वापरत येतात म्हणून सगळीच कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे.
- प्रूफ ऑफ आयडेंटिटी (PoI)
- PAN Card
- Passport
- Ration/PDS Photo Card
- Driving License
- Photo Bank ATM Card
- Government-issued Photo ID Card
- प्रूफ ऑफ ऍड्रेस (PoA)
- Passport
- Bank Statement/Passbook
- Ration Card
- Voter ID
- Driving License
- Electricity Bill – not older than 3 months
- Water Bill – not older than 3 months
- लँडलाइन टेलिफोन बिल हे तीन महिन्यांपेक्षा जुने नसावे