देशात कोरोनाचे (Corona) पुन्हा आगमन? २४ तासांत ५६४ नवे रुग्ण, मृत्यूंची संख्या वाढतेय! 2025

Corona

(Corona) : देशाभरात पुन्हा एकदा करून आम्ही थैमान घालायला चालू केली आहे तुम्हाला माहितीच असेल की मागचा लोक डाऊन हे कोरोना च्या आजारामुळे लागले गेले होते पण असे केसेस किंवा अशा व्यक्ती पुन्हा एकदा सापडत आहे ज्यांना करोना झाला आहे.


२४ तासांत कोरोनाचे ५६४ नवीन रुग्ण आढळले असून, दुर्दैवाने सात जणांनी आपला जीव गमावला आहे. राजस्थान आणि दिल्ली या दोन शहरांबद्दल बोलायचं झालं तर इथे करुणाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. मागील २४ तासांत १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यात दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. खूप गंभीर बाब अशी देखील आहे की या मेलेल्या व्यक्तींमध्ये एक पाच महिन्याचा लहान शिशु आणि 87 वर्षाचे आजोबा देखील होते. सध्याच्या परिस्थितीत जर का बघायचं झालं तर आज चार तारखे मध्ये 562 हे सक्रिय करून रुग्णांची संख्या दिल्लीमध्ये दाखल करण्यात आली आहे.

कोरोना (Corona) व्हायरसची स्थिती पुन्हा एकदा देशभरामध्ये निर्माण होत आहे. जसा मी तुम्हाला सांगितलं की देशाभरामध्ये मागील काही 24 तासांमध्ये कोविड-19 चे 564 केसेस हे दाखल झाले आहे. याच्याच व्यतिरिक्त करुणाचे जे ऍक्टिव्ह केसेस आहेत म्हणजेच जे ऍक्टिव्ह रुग्ण आहे ते 4305 वरून वाढून ते 4900 पर्यंत वाढले गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर का आपण स्वास्थ मंत्रालय आणि इतर राज्यांनुसार जी काही माहिती मिळाली त्यानुसार जर का विचार केला किंवा त्या बातम्या बद्दल जर का आपण व्यवस्थित विचार केला तर मागील 24 तासात सात लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

दिल्लीची चिंताजनक परिस्थिती

आपल्या भारताचे राजधानी असलेले दिल्ली शहर त्याच्यामध्ये कोरोनाचे (Corona) संक्रमण हे खूप वेगाने पसरत आहे.फक्त दिल्लीचीच गोष्ट केली, तर मागील २४ तासांत १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि दुर्दैवाने यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.मृतकांमध्ये एक पाच महिन्याचा लहान शिशु होता आणि 87 वर्षाचे एक आजोबा होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्ली या शहरामध्ये 565 अशी सक्रिय केसेस म्हणजेच ऍक्टिव्ह करोना रोपण हे दाखल केले गेले आहेत.

कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये देखील मृत्यू


जसं की कोविड (Corona) हा पसरत आहे पूर्ण देशभरामध्ये त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक मध्ये देखील हा करोना पसरत आहे. कर्नाटक मध्ये दोन लोकांचा मृत्यू आणि महाराष्ट्रामध्ये तीन जणांचा मृत्यू वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र मध्ये देखील खूप ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे त्यातील सर्वात महत्त्वाचं जागा म्हणजे पुणे शहर. पुणे शहरातही ४०० पेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आह.

(Corona) वर्तमान स्थितीमध्ये गुजरात मध्ये 508, कर्नाटक मध्ये 436, केरळ मध्ये 1487, महाराष्ट्र मध्ये 626 आणि पश्चिम बंगाल मध्ये 638 (Corona) केसेस दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेश मधल्या इंदूर शहरात देखील सात नवीन करुणाचे रुग्ण निर्माण झाले आहेत म्हणजेच हे रुग्ण पॉझिटिव्ह असले यांची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये तीन महिला आणि चार पुरुष यांचा समावेश आहे. ज्यांच्यामध्ये काही लोक हे उत्तर प्रदेश आणि ओडिसा केरल या राज्यातून परत आले होते.

इंदोर जिल्ह्यामध्ये एकूण (Corona) 17 ॲक्टिव्ह केसेस सध्या तरी दाखल झाले आहे. आनंदाची गोष्ट तर ही आहे की हे संक्रमित झालेले जे काही रुग्ण आहेत त्यांना असा काहीही गंभीर आजाराची लक्षणे दिसत नाही आहे. जसा तुम्हाला माहितीच असेल की कोरोना काळामध्ये जे लोक करोना पॉझिटिव्ह होते त्यांना होम आयसोलेशन करण्यात आलं होतं त्याच प्रकारे या सात रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. दोर शहरात १ जानेवारी २०२५ पासून आत्तापर्यंत एकूण ४० रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिलमध्ये 74 वर्षाची एक महिला यांची कोरोनच्या आजारामुळे मृत्यू झाला होता पण या महिला अगोदर पासूनच किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते.

पश्चिम बंगाल मध्ये 106 नवीन रुग्ण, कोणाचाही मृत्यू नाही

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 106 करोना (Corona) पॉझिटिव्ह रुग्ण निर्माण झाले आहे आणि गव्हर्नमेंट नुसार त्यांची नोंदही करण्यात आली आहे. राज्यामध्ये 538 ऍक्टिव्ह किंवा सक्रिय असे रोग दाखल केले गेले आणि त्यामध्ये 61 लोक हे दुपारी सुद्धा करण्यात आली आहेत. पुन्हा एकदा दिलासादायक बाब ही आहे की सध्या तरी एकाही मृत्यूची नोंद आलेली नाही.

तर मित्रांनो घाबरून जायचे काही गरज नाहीये पण ह्यासोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं देखील खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या योग्य तो आहार घ्या आणि छोट्याशा छोट्या गोष्टी देखील काळजीपूर्वक सांभाळा जरासही आपल्या आरोग्याबद्दल काही झाले तर लगेच डॉक्टरची संपर्क साधा कारण आरोग्य हेच पैसा आहे.
तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लोकांबरोबर शेअर करा जेणेकरून करुणाच्या बाबतीत आता सध्या काय परिस्थिती आहे ती सर्वांना समजत राहील.

कोरोनाव्हायरसचे परिणाम काय आहेत?

जेव्हा २०२० मध्ये कोरोनाव्हायरसची साथ आली, तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की हा आजार एवढ्या खोलवर परिणाम करेल. सुरुवातीला वाटलं, ही एक सामान्य फ्लू सारखी लाट आहे, जी काही दिवसात ओसरेल. पण जसजसे दिवस गेले, आपण सर्वजण हळूहळू एका अनोळखी वास्तवात जगायला लागलो. या विषाणूने केवळ शरीरावर आघात केला नाही, तर मनावर, कुटुंबांवर, नात्यांवर आणि आपल्यातील माणुसकीवर सुद्धा खोल ओरखडे उमटवले. शारीरिकदृष्ट्या पाहिलं, तर कोरोनाने फुफ्फुसांवर परिणाम करून श्वसनास अडचण निर्माण केली, ज्यामुळे लाखो लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. यामध्ये काही जणांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं, काही जणांनी स्वतः मृत्यूशी झुंज दिली. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्स मिळण्याची धावपळ, आणि डॉक्टर्स-नर्सेसचा अहोरात्र लढा हे सगळं अजूनही आपल्याला अंगावर काटा आणतं. ते केवळ आरोग्य संकट नव्हतं, तर माणसाच्या असहायतेचं जिवंत उदाहरण होतं.

पण कोरोनाचे परिणाम केवळ शरीरापुरते मर्यादित राहिले नाहीत. मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम हा त्याहून अधिक खोल आहे. सततचा लॉकडाऊन, समाजापासून ताटातूट, एकटेपणा, बेरोजगारी, आर्थिक संकटं यामुळे अनेकांनी मानसिक खचापती अनुभवल्या. कामकाज घरी बसून करायचं, मुलांना शाळा ऑनलाईन करावी लागणं, वृद्ध लोकांना सतत भीतीनं जगावं लागणं या सगळ्यांनी मनावरचा भार अधिकच वाढवला. काही लोक नैराश्यात गेले, काहींना झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या, आणि काहींनी तर आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘मानसिक आरोग्य’ या विषयाला समाजात नवी जागा मिळाली, ही कोरोनाची एक अप्रत्यक्ष जमेची बाजू म्हणावी लागेल. पण या सगळ्यामुळे आपण एक गोष्ट नक्की शिकलो – की शरीराचं आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मनाचंही आहे. आणि आपण ते दोन्ही एकाच वेळी सांभाळण्याची गरज आता सर्वांनाच जाणवली.

कोरोनाव्हायरसच्या या संपूर्ण अनुभवाने माणसाच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडवले. आज आपण स्वच्छता, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या सवयी आपोआप अंगी बाणवायला लागलो आहोत. सामाजिकदृष्ट्या पाहिलं, तर या आजाराने आपल्याला कुटुंबाचं, माणसातल्या सहवेदनशीलतेचं खूप मोठं मूल्य शिकवलं. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित झाली, तेव्हा तिच्यासाठी शेजारी, मित्र, नातेवाईक सगळेच धावून गेले. कोरोना काळात जेव्हा काहीच खात्रीचं नव्हतं, तेव्हा एका फोन कॉलनेही आधार वाटायचा. हीच ती खरी सामाजिक ताकद आहे. कोरोनाच्या परिणामांनी जग थांबवलं, पण आपल्यातली माणूसपणाची भावना अधिक जागी केली. ही अशी एक गोष्ट आहे जी आपण आपल्या मुलांना, नातवंडांना अभिमानानं सांगू शकतो की कितीही मोठं संकट आलं तरी, जर आपण एकमेकांच्या पाठिशी उभं राहिलो, हातात हात घालून चाललो, तर कोणतंही वादळ पार करता येतं.

कोविड-१९ किती लवकर पसरतो?

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग किती लवकर पसरतो, हे आपण गेल्या काही वर्षांत अनुभवातून पाहिलं आहे. एक व्यक्ती संक्रमित झाली की तिच्याशी अगदी काही मिनिटांचाही संपर्क आलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो, हे भयावह वास्तव आहे. विशेषतः जेव्हा कोणालाही लक्षणं नसतात म्हणजेच तो “asymptomatic carrier” असतो तेव्हा त्याच्याकडून अनजाणे पद्धतीने हा विषाणू इतरांपर्यंत पोहोचतो. मला अजूनही आठवतं, पहिल्या लाटेच्या काळात आमच्या कॉलनीत एक गृहस्थ केवळ किराणा दुकानात गेले आणि दोन दिवसांत संपूर्ण बिल्डिंग क्वारंटाईन झाली. कोविड-१९ इतका वेगानं पसरतो की तुम्ही हात धुणं, मास्क लावणं किंवा अंतर राखणं थोडं दुर्लक्षित केलं, तर तो चुकूनही क्षमा करत नाही. त्याचं रूप बिनआवाजाचं आहे – दिसत नाही, पण दणका मात्र जोरात देतो. त्यामुळे त्याच्या गतीचा अंदाज घेणं म्हणजे एक वेळी पाण्याच्या प्रवाहात पाय ठेवण्यासारखं आहे – तो दिसत नसला तरी तुम्हाला ओढून नेल्याशिवाय राहत नाही.

या विषाणूच्या पसरण्याची गती विशेषतः गर्दीच्या ठिकाणी अधिक असते जसं की लग्नसमारंभ, ट्रेन्स, कार्यालयं, शाळा, किंवा अगदी घरातील एकत्र जेवणं. कोविड-१९ प्रामुख्याने ड्रॉपलेट्समधून आणि हवेतून पसरतो. म्हणजे एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शिंकल्याने किंवा खोकल्यामुळे तयार झालेल्या लघुतम थेंबांमधून इतरांना हा विषाणू संसर्ग करतो. म्हणूनच मास्क वापरणं, हात वारंवार धुणं आणि सामाजिक अंतर पाळणं इतकं महत्त्वाचं ठरतं. पण फक्त नियम पाळून भागत नाही, त्यामागे सजगता आणि एकमेकांसाठीचा विचार हवा. अनेक वेळा लोकांना वाटतं, “आपल्याला काही होणार नाही”, पण त्याचवेळी आपण आपल्या आजी-आजोबांसारख्या वृद्ध व्यक्तींना धोका निर्माण करतो. मला स्वतः आठवतं, जेव्हा एका मित्राला लक्षणं नसताना सुद्धा कोविड झाला आणि त्यानं घरी वडिलांना संसर्ग दिला, वडिलांची तब्येत इतकी बिघडली की ICU पर्यंत जावं लागलं. तो अपराधगंड, तो मानसिक भार यामुळे तो खूप दिवस सावरू शकला नाही. त्यामुळेच कोविडचा वेग फक्त वैज्ञानिक भाषेत सांगणं पुरेसं नाही, तो भावनिक आणि सामाजिक जबाबदारीच्या नजरेतून समजून घ्यावा लागतो.

आज आपण जरी लस घेतली असेल, मास्क वापरणं, स्वच्छता पाळणं अशा सवयी अंगवळणी पाडल्या असतील, तरी खरं सांगायचं तर कोविडचं सावट अजूनही पूर्णपणे गेलेलं नाही. थोडंसं गाफील झालं, की तो परत डोकं वर काढतो, अगदी जणू कुठंतरी लपून बसलेला शत्रूच! त्याच्या नव्या रूपांतरणांमुळे (variants) हा आजार पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो, आणि त्याची पसरण्याची गती अनेकदा पूर्वीपेक्षा जास्तच असते. त्यामुळेच आता आपण या विषाणूच्या गतीविषयी भीती न ठेवता, जागरूकता ठेवणं जास्त गरजेचं आहे. प्रत्येक वेळी सरकार निर्देश देते, पण त्याची खरी जबाबदारी आपल्यावर आहे, मास्क लावणं, लक्षणं दिसल्यास तपासणी करणं, आणि इतरांपासून थोडं अंतर ठेवणं ही लहान पावलं मोठा बदल घडवू शकतात. कोविड आपल्याला हे शिकवून गेलं की, आरोग्य ही केवळ स्वतःपुरती गोष्ट नाही, तर ती आपलं एकत्रित अस्तित्व टिकवण्याची शिस्त आहे. किती लवकर पसरतो हा विषाणू, हे महत्त्वाचं खऱंच; पण त्यापेक्षा महत्वाचं आहे आपण किती लवकर तो पसरू नये म्हणून जबाबदारीनं वागतो!

आणखी वाचा

Tata Avinya 2025 : Mahindra XEV 9e टक्कर देणारी टाटाची भौकाली इलेक्ट्रिक गाडी!

Tata Punch 2025 : Tata ची हि गाडी येणार आहे लवकरच जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता संधी घालवू नका ! Honda CB Hornet 160R फक्त 50 हजार रुपये मध्ये – जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *