
Table of Contents
Monsoon Update – अतिवृष्टीचा इशारा
Monsoon Update: तुम्हालाही जाणवले असेल की सध्या पावसाने चांगलाच जोर धरलाय. आणि खूप राज्यात आता पाऊस पडायला चालू झाला आहे. पण अतिवृष्टी ही एक चेतावणी आहे सर्वे नागरिकांसाठी. कारण ही बातमी तुम्ही वाचली तर तुमच्या राज्यात होणाऱ्या अतिवृष्टी साठी तयार राहू शकता.
चला तर मग, सुरुवातीला IMD म्हणजे काय ते समजून घेऊया, कारण पुढच्या सविस्तर माहितीत हा शब्द अनेक वेळा येणार आहे. तर IMD म्हणजेच मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि साध्या सरळ सोप्या शब्दात चरखा सांगायचं झालं हवामान खाते. हे काम करत हवामानाच्या नुसार झालेले बदल लोकांपर्यंत पोहोचवणे. जर का काही अनिश्चित घडणार असेल तर ते सर्वात प्रथम नागरिकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे जेणेकरून ते त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतील.
सरळ मुद्द्यावर येऊयात, कालच म्हणजे २३ मे ला अतिवृष्टी अलर्ट हा महाराष्ट्राच्या खूप साऱ्या costal district मध्ये सांगितला होता. हवामानखात्यानुसार म्हणजेच IMD नुसार एक कमी दाबाचा पट्टा अरेबिक समुद्रामध्ये निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा ही एक चेतावणी आहे अतिवृष्टी साठी म्हणजेच पुढील ३६ तासात अतिवृष्टी होण्याची संभावना आहे. हवामानखात्यानुसार भारताच्या खूप ठिकाणी Res Alert जारी केला आहे. काही पश्चिमी भारतामध्ये हा अलर्ट पुढच्या हफ्त्या पर्यंत आहे.देशाच्या इतर भागामध्ये उष्णतेची लाट ही सुरूच आहे.
Monsoon Update – हवामानखात्याने सर्व नागरिकांना चेतावणी दिली आहे आणि त्यांनी गुरुवारी दुपारी बातम्यांमध्ये पण सांगितले होते की – ‘ एक कमी दाबाचा पट्टा पूर्वीय मध्य अरेबिक समुद्रामध्ये खरे म्हणजे दक्षिण कोकण किंवा गोवा मध्ये निर्माण झाला आहे. हा पट्टा फूडच्या ३६ तासांमध्ये उत्तरेकडे जाण्याची संभावना आहे. जसे की इतकी मोठी बातमी आहे पण हवामानखात्याने चक्रीवादळाची काही ही चेतावणी दिली नाहीय.Meteological department ने मच्छीमारांना पण सांगितले आहे की तुम्ही पच्चिमी तटावर जाऊ नका.
रेड अलर्ट जारी केला आहे खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये.
Monsoon Update : आयएमडी च्या अनुसार जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तो दक्षिण कोकण म्हणजेच गोवा च्या कोस्टलवर निर्माण झाला आहे आणि असं समजलं ही जात आहे की ते उत्तरेकडे प्रस्थान करेल. ही बातमी किती खरी आहे यासाठी जे साक्षीदार हे गोवन लोकच आहेत कारण 22 ते 24 मे मध्ये तिथे अतिवृष्टी झाल्याचे प्रमाण मिळण्यात येतो. मुंबई ठाणे आणि पालघर यामध्ये ऑरेंज कलर हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरी मध्ये वाईट रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
बुधवारी रात्रीपासून हा पाऊस चालू झाला आहे आणि हवामान खात्याच्या अनुसार हा पाऊस गरजेच्या वेळेच्या अगोदरच पडलेला आहे. मुंबईमध्ये तर इतकी हालत खराब आहे की मुंबईचे सर्व रस्ते खराब झाले आहेत. हवामान खात्यानुसार मुंबईमध्ये हा खूप कमी पावसाची शक्यता आहे मे मध्ये. मागील काही वर्षांमध्ये जो काही पाऊस पडला त्यामध्ये यावर्षी 700% जास्त पाऊस हा नोंदवला गेला आहे. आणि तुम्हीही लक्षात घेतलं असेल की, हल्ली हवामानही बरंचसं थंड झालं आहे.
मच्छीमारांसाठी चेतावणी
Monsoon Update: सामान्य व्यक्ती ही रोज रोज समुद्रामध्ये काही कामांसाठी जात नाही पण मच्छीमार हे असे व्यक्ती आहेत ज्यांना आपलं काम करण्यासाठी समुद्रामध्ये रोज जावं लागतं आणि त्यासाठीच हवामान खात्याने त्यांच्यासाठी काही निर्देश जारी केले आहे.
IMD ने म्हणजेच हवामान खात्याने मच्छीमारांना सांगितले आहे की त्यांनी पश्चिमी तटावरती जाणं टाळले पाहिजे.
IMD म्हणजेच मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच हवामान खात्याने मच्छीमारांसाठी नाव सांगितले आहे की तुम्ही पश्चिमी तटावरती जाऊ नये.सोमाली किनारपट्टी आणि नैऋत्य समुद्रावर 27 मे पर्यंत आणि पश्चिमी मध्य समुद्रावरती 25 ते 26 मे पर्यंत धोकादायक परिस्थिती राहील.
मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच हवामान खात्याने अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केले आहे तेही गुजरात गोवा कर्नाटका केरला आणि कोकण या भागांमध्ये. पुढच्या सहा ते सात दिवसांमध्ये तिथे अतिवृष्टी होण्याची संभावना आहे. अतिवृष्टीचा सर्वात जवळचा इशारा हा कर्नाटकच्या लोकांसाठी आहे कारण तिथे लवकरच कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तिथे अतिवृष्टी होण्याची संभावना आहे.
मान्सूनचं आगमन – निसर्गाचं साद देणं
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वांचं लक्ष होतं, “पाऊस केव्हा येणार?” या प्रश्नाकडे. पण यंदाचा २०२५ चा मान्सून काहीसा घोळ घालतच दाखल झाला. काही भागांत जूनच्या पहिल्याच आठवड्यात हलकीसरशी सरी झाल्या, पण अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाची झळ आणि घामेजलेली हवा अजूनही जाणवत होती. मात्र आता हवामान खात्यानं जाहीर केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे.
या पावसामुळे एकीकडे उन्हाच्या त्रासातून थोडा दिलासा मिळणार असला, तरी दुसरीकडे अचानक होणाऱ्या मुसळधार सरींमुळे नद्या भरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील काही भागात पूरस्थिती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज राहायला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही जोरदार पावसामुळे वाहतूक, शाळा, वीज पुरवठा यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळणं, तसेच सरकारी सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे.
शेतीची चिंता आणि शेतकऱ्यांचं मन
पाऊस म्हणजे आपल्यासाठी फक्त थंडावा नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी एक आशेचा किरण आहे. ज्या भागांत मान्सून वेळेवर पोहोचतो, तिथे खरीप हंगामाची सुरुवात होते. पण यंदा काही भागांत उशिरा पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. पेरणी योग्य वेळेत होईल की नाही? बियाणं सडून जाईल का? खतं वेळेवर मिळतील का? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत.
कोकणात नारळ, आंबा आणि भातासाठी पाऊस अत्यंत आवश्यक आहे, तर विदर्भात सोयाबीन, तूर यांसाठी योग्य वेळेचा पाऊस महत्त्वाचा ठरतो. जर पावसाचं वेळापत्रक अजून घसरलं, तर या भागांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसेल. सरकारकडून काही भागांत सौर पंप, पाणी साठवणूक आणि बियाणांची मदत केली जात आहे, पण तरीही खरी गरज आहे नियमित, समप्रमाणात आणि योग्य वेळेचा पाऊस. कारण शेतकऱ्याचं मन पाण्यावर, आणि त्याच्या स्वप्नांचं पीक आभाळाकडे बघत उभं असतं.
शहरी जीवनातली पावसाची तयारी
शहरी भागात मात्र पाऊस म्हणजे जरा वेगळं दृश्य. ऑफिसला जाताना पावसात भिजणं, ट्रॅफिकमध्ये अडकणं, लोकल ट्रेन बंद पडणं ही सगळी दृश्यं दरवर्षी अनुभवली जातात. पण यंदा हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांमध्ये प्रशासन आधीच अलर्ट झालं आहे. नालेसफाई, वीज यंत्रणा, आपत्कालीन हेल्पलाइनसारख्या गोष्टी तपासल्या जात आहेत.
पण या सगळ्याच्या पलीकडे, पावसाचा एक वेगळा अर्थही असतो – घरातल्या खिडकीतून खाली पडणारे थेंब, गरम चहा आणि भजीचा वास, आणि मनात नकळत जागा घेणारी आठवणीची ओल. निसर्गाचा हा ऋतू म्हणजे केवळ हवामानातील बदल नाही, तर आपल्या आयुष्याला थोडं थांबायला, विचार करायला आणि निसर्गाशी नातं पुन्हा एकदा जोडायला मिळणारी संधी असते.
Monsoon Update: तर नागरिकांनो अतिवृष्टीचा धोका हा तुम्हाला या ब्लॉग मार्फत किंवा या आर्टिकल मार्फत तुम्हाला समजण्यात आला आहे. मी सांगितलेल्या राज्यांमध्ये जर का तुमचे प्रियजन राहत असतील तर त्यांना नक्कीच हा ब्लॉग शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की पुढे काय करावे. माझी इच्छा इतकीच आहे की तुम्ही सुरक्षित रहा आणि पुढील येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही योग्य ते प्रयत्न करा.
जर का तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच शेअर कमेंट करा.